कर्जत : मध्य रेल्वेची (central railway) मुंबईकडे येणारी वाहतूक विस्कळीत झाली आहे. कर्जत- भिवपूरी स्थानकादरम्यान पेंटाग्राफ तुटल्यामुळे मध्य रेल्वे मार्गावरील लोकल वाहतूक काही तासांसाठी ठप्प झाली होती. त्यामुळे कामाच्या लगबगीत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना आज लेटमार्क लागला आहे.
https://prahaar.in/2025/02/06/valentines-week-valentines-week-is-starting-from-friday-which-day-see-the-complete-list/
मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळच्या सुमारास कर्जत रेल्वे स्टेशनमध्ये लोकलचा पेंटाग्राफ तुटल्यामुळे दीड तासांपासून मुंबईच्या दिशेला येणारी लोकल वाहतूक बंद झाली होती. तातडीने दुरुस्तीचे काम पूर्ण करण्यात आल्यानंतर दीड तासाने कर्जत-सीएसएमटी लोकल वाहतूक सुरू करण्यात आली. मात्र लोकलसेवा उशिराने सुटत असल्यामुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. (Central Railway)