मुंबई : सरकारी नोकऱ्या आणि शिक्षणात मराठा आरक्षण कायद्याला आव्हान देणाऱ्या याचिकांवर मुंबई उच्च न्यायालयात नव्यानं पुन्हा सुनावणी होणार आहे. सुरुवातीपासून ही सुनावणी सुरू होणार आहे.
https://prahaar.in/2025/01/29/pune-mhada-lottery-announced-konkan-mhada-lottery-will-be-conducted-on-february-5/
मुंबई उच्च न्यायालयात नव्या मुख्य न्यायमूर्तींची नियुक्ती झाली आहे. यानंतर याचिकाकर्त्यांनी मराठा आरक्षणाबाबतच्या याचिकांवर नव्यानं सुनावणी घेण्याची विनंती केली होती. ही विनंती मान्य झाली आहे. सुनावणीसाठी नवीन विशेष पूर्णपीठ स्थापन केले जाणार आहे. याचिकाकर्त्यांनी रजिस्ट्रारकडे याचिकेसाठी नव्याने नोंदणी करावी, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत.
https://prahaar.in/2025/01/29/attack-on-bollywood-actor-saif-ali-khan-accused-sent-to-judicial-custody-for-14-days/
आधीच्या न्यायमूर्तींच्या समोर याचिकांची ६० टक्के सुनावणी झाली होती. पण मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्ती या पदावर आलोक आराधे या नव्या न्यायमूर्तींची नियुक्ती झाली. यामुळे याचिकांची नव्याने आणि सुरुवातीपासून सुनावणी घेण्याची मागणी याचिकाकर्त्यांनी केली. ही मागणी मान्य झाली आहे. उच्च न्यायालयाने मागणी मान्य केल्यामुळे सुनावणी नव्याने सुरू होणार आहे. यामुळे मराठा आरक्षणाचा न्यायालयातील खटला निकाली निघण्यास आणखी वेळ लागण्याची शक्यता आहे.