Friday, May 9, 2025
Homeताज्या घडामोडीTRAIच्या आदेशानंतर एअरटेलची नरमाईची भूमिका, लाँच केले स्वस्त रिचार्ज प्लान्स

TRAIच्या आदेशानंतर एअरटेलची नरमाईची भूमिका, लाँच केले स्वस्त रिचार्ज प्लान्स

मुंबई: ट्रायच्या आदेशानंतर जिओ आणि एअरटेलने आपले स्वस्त प्लान्स लाँच केले आहेत. कंपनी केवळ कॉलिंग आणि एसएमएसचे ऑप्शन आपल्या पोर्टफोलिओमध्ये जोडत आहेत. या क्रमामध्ये एअरटेलने आपले दोन नवे रिचार्ज प्लान्स ४९९ रूपये आणि १९५९ रूपयांचे प्लान्स लाँच केले आहेत. दोन्ही प्लान्स अनुक्रमे ८४ दिवस आणि ३६५दिवसाच्या व्हॅलिडिटीसह येतात.

४९९ रूपयांच्या प्लानबद्दल बोलायचे झाल्यास यात तुम्हाला ८४ दिवसांची व्हॅलिडिटी मिळते. हा प्लान अनलिमिटेड कॉलिंग आणि ९०० एसएमएस फायद्यांसह येतो. यात तुम्हाला डेटा मिळणार नाही. अतिरिक्त फायद्यांच्या नावावर कंपनी अपोलो २४ बाय ७ सर्कल आणि फ्री हॅलो ट्यूनचा अॅक्सेस देत आहे.

तर दुसरा प्लान १९५९ रूपयांचा आहे. यात तुम्हाला एका वर्षाची म्हणजेच ३६५ दिवसांची व्हॅलिडिटी मिळते. यात तुम्हाला डेटा बेनेफिट मिळत नाही. या रिचार्ज प्लानमध्ये कंपनी अनलिमिटेड कॉलिंग आणि ३६०० एसएमएस संपूर्ण व्हॅलिडिटी देत आहे. सोबतच अतिरिक्त फायदेही मिळत आहेत.

डेटा वापरासाठी तुम्हाला दुसरे प्लान्स खरेदी करावे लागतील. ट्रायने टेलिकॉम ऑपरेटर्स कंपन्यांना केवळ कॉलिंग आणि एसएमएसचे प्लान लाँच करण्यासाठी सांगितले होते. त्यानंतर कंपनीने हे पाऊल उचलले आहेत. ऑथॉरिटीचे म्हणणे आहे की अनेक युजर्स असे आहेत जे डेटाचा वापर करत नाही. त्यांनाही डेटाचा प्लान घ्यावा लागतो. अशा युजर्ससाठी वेगवेगळे प्लान लाँच करावे लागतील.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -