Home ताज्या घडामोडी Chhattisgarh Encounter : छत्तीसगडमध्ये चकमक सुरुच! ३ नक्षलवादी ठार

Chhattisgarh Encounter : छत्तीसगडमध्ये चकमक सुरुच! ३ नक्षलवादी ठार

Chhattisgarh Encounter : छत्तीसगडमध्ये चकमक सुरुच! ३ नक्षलवादी ठार

विजापूर : छत्तीसगडमध्ये चकमकीचे (Chhattisgarh Encounter) सत्र सुरुच असल्याचे दिसून येत आहे. आज सकाळपासूनही छत्तीसगडमध्ये विजापूर जिल्ह्यात सुरक्षा कर्मचारी आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली असल्याची माहिती मिळत आहे. यामध्ये ३ नक्षलवादी ठार झाले असून शस्त्रे, स्फोटके आणि स्वयंचलित शस्त्रे यासह नक्षलवादी साहित्य जप्त करण्यात आले आहेत.

https://prahaar.in/2025/01/12/a-cut-to-the-pockets-of-the-common-man-after-st-now-rickshaw-and-taxi-travel-will-become-more-expensive/

एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने सांगितल्यानुसार, सुरक्षा कर्मचाऱ्यांचे एक संयुक्त पथक नक्षलविरोधी मोहिमेवर होते. त्यावेळी सकाळच्या सुमारास पोलीस स्टेशन हद्दीतील जंगलात ही चकमक सुरू झाली. यावेळी ३ नक्षलवाद्यांना कंठस्नान दिले आहे. सध्या सुरक्षा रक्षकांकडून नक्षलवाद्यांची ओळख पटवली जात आहे.