उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेशमधील प्रयागराजमध्ये महाकुंभ हा मकर संक्रांतीच्या दिवसापासून म्हणजेच १३ जानेवारीपासून सुरू होत आहे. जगातील सर्वात मोठा धार्मिक मेळावा असलेला कुंभमेळा हा १५ किलोमीटरच्या परिघात सुमारे ४५ दिवस चालणार आहे. या महाकुंभ मेळाव्यात नागा साधू येतात त्यांना धर्मरक्षक म्हटले जाते.
https://prahaar.in/2025/01/12/mastermind-valmik-karads-arms-license-revoked/
नागा म्हणजे काय?
जे भिक्षू कपड्यांशिवाय राहतात त्यांना नाग म्हणतात. तसेच त्यांना दिगंबर असेही म्हणतात. सनातन धर्मात नागा साधू हे संपूर्ण जीवनात देवाच्या भक्तीत मग्न राहतात. ते कधीही कपडे घालत नाहीत. तसेच इतिहास डोकावला तर असे लक्षात येते की याबाबत शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद म्हणाले, “नागा हा शब्द नागपासून आला आहे. नाग म्हणजे पर्वत. जे हलत नाहीत, ते एकाच ठिकाणी राहता त्याला नाग म्हणतात.
हा आहे इतिहास
प्राचीन काळात अनेक आक्रमणकर्त्यांना भारतावर हल्ले. त्यांचा पसरवण्यासाठी जनतेवर अत्याचार केले. त्या आक्रमकांना रोखण्यासाठी नागा साधू पुढे आले. त्यांनी परकीयांविरोधात अनेक लढाया लढल्या आहेत. नागांनी त्यांच्या धर्माचे रक्षण करण्यासाठी आपले प्राणही अर्पण केले. यामुळे सामान्य लोकांमध्ये त्यांचे महत्त्व आणि आदर आणखी वाढला. त्यांना शूर पुरुष, धर्मरक्षक आणि धर्मवीर म्हणून ओळखले जाते.
शास्त्राबरोबर शस्त्राची काय आहे परंपरा ?
नागा साधुंनी धर्म आणि समाजासाठी अनेक लढाया लढल्या आहेत. नागा साधू हे जगतगुरू आदि शंकराचार्यांनी स्थापन केलेल्या आखाड्यांच्या काळापासून शस्त्रे वापरण्यात तरबेज आहेत. प्राचीन काळी नागा साधू त्रिशूळ, भाला, तलवार, कुऱ्हाड आणि खुकरी वापरत असत. आदि गुरु शंकराचार्यांनी स्थापन केलेल्या दशनामी संन्यासी परंपरेतील नागा संन्यासी आखाड्यांमध्ये शस्त्रांची पूजा करण्याची परंपरा आहे. गेल्या २,५०० वर्षांपासून दशनामी संन्यासी परंपरेतील नागा संन्यासी ही परंपरा पाळत आहेत. ते आखाड्यांमध्ये शस्त्रांची पूजा करतात.