साडेसात वर्षांच्या रिलेशनशिप! हेमल इंगळेने बॉयफ्रेंडशी बांधली लग्नगाठ!

‘अशी ही आशिकी’ या चित्रपटामुळे अभिनेत्री हेमल इंगळे घराघरांत लोकप्रिय झाली. 

अभिनेत्रीने रौनक चोरडियाशी लग्नगाठ बांधली आहे. 

हेमल इंगळेने लग्नात गुलाबी रंगाचा भरजरी लेहेंगा  घातला होता. 

मोकळे केस, सुंदर लेहेंगा, गळ्यात नेकलेस, हातात चुडा या लूकमध्ये अभिनेत्री सुरेख दिसत होती.

हेमलच्या नवऱ्याने लग्नात ऑफ व्हाइट रंगाची शेरवानी घातली होती. 

रौनक हा कलाविश्वापासून दूर असून त्याचा स्वत:चा व्यवसाय आहे.

 संपूर्ण सिनेविश्वातून या जोडप्यावर कौतुकाचा वर्षाव करण्यात येत आहे.

जवळपास साडेसात वर्षे एकमेकांना डेट केल्यावर आज हे जोडपं लग्नबंधनात अडकलं आहे.