Home देश Cyclone Fengal : फेंगल’ चक्रीवादळाची तीव्रता वाढली

Cyclone Fengal : फेंगल’ चक्रीवादळाची तीव्रता वाढली

0
Cyclone Fengal : फेंगल’ चक्रीवादळाची तीव्रता वाढली

नवी दिल्ली : बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या फेंगल चक्रीवादळाचा (Cyclone Fengal) प्रभाव किनारपट्टीलगतच्या राज्यांत पाहायला मिळत आहे. उत्तर तामिळनाडू, दक्षिण आंध्रप्रदेश आणि पुद्दुचेरी या भागांत मुसळधार पाऊस सुरू आहे. या नैसर्गिक आपत्ती दरम्यान भारतीय हवामान खात्याचे महासंचालक डॉ. मृत्युंजय मोहापात्रा यांनी सावधानतेचा इशारा दिला आहे.

डॉ. मृत्युंजय मोहापात्रा यांनी म्हटले आहे की, फेंगल हे चक्रीवादळ नैऋत्य बंगालच्या उपसागरावर केंद्रीत आहे. जेव्हा हे चक्रीवादळ उत्तर तमिळनाडू किनारपट्टीला धडकेल, तेव्हा वाऱ्याचा वेग ७०-८० किमी/तास असण्याची शक्यता असल्याचेही ते म्हणाले.

https://prahaar.in/2024/11/30/gram-sabha-decision-rs-500-fine-for-abusing/

चक्रीवादळाच्या (Cyclone Fengal) किनारपट्टीला धडकण्याने लहान झाडे उन्मळून पडू शकतात. किनारपट्टीवरील घरांचे नुकसान होऊ शकते. काही ठिकाणी टेलिफोन लाईन्स आणि पॉवर लाईन्सचे देखील नुकसान होण्याची शक्यता आयएमडीचे महासंचालक डॉ. मोहापात्रा यांनी वर्तवली आहे. बंगाल उपसागरावर घोंघावत असलेल्या फेंगल चक्रीवादळाचा प्रभाव तामिळनाडू, आंध्रप्रदेश आणि पुद्दुचेरीमधील अनेक शहरांमध्ये दिसून येत आहे.