मेकअप करण्यासाठी आहेत हे महत्वाचे ब्रशेस!

फाउंडेशन ब्रशेस

हा ब्रश फाउंडेशन चेहऱ्यावर   पसरवण्यासाठी वापरता येतो. 

कन्सीलर ब्रश 

डोळ्यांखाली डागांवर किंवा लालसरपणावर कंसीलर लावा आणि ब्रशच्या मदतीने हलक्या हाताने मिसळा. 

पावडर ब्रश

या ब्रशने चेहऱ्यावर लूज पावडर किंवा कॉम्पॅक्ट पावडर हलक्या हातांनी लावता येते.

ब्लश ब्रश

गालावर हलकेच ब्लश लावा आणि या ब्रशने वरच्या दिशेने पसरवा.

हायलाइटर ब्रश 

ब्रशच्या मदतीने हायलाइटर लावून तुम्ही गालाची हाडे, नाक आणि कपाळाची हाडे हायलाइट करू शकता.

आयशॅडो ब्रश

जर तुम्हाला परिपूर्ण डोळ्यांचा मेकअप हवा असेल तर योग्य आयशॅडो ब्रश वापरणे खूप महत्वाचे आहे.

लीप ब्रश 

 लिपस्टिक ब्रशचा वापर करून तुम्ही लिपस्टिक आणि लिप लायनर दोन्ही व्यवस्थित लावू शकता.

ब्रॉन्झर ब्रशेस

चेहरा बारीक दिसण्यासाठी ब्रॉन्झरचा वापर केला जातो,या ब्रशने ब्रॉन्झर घेऊन नीट पसरवा

मेकअप स्पंज

स्पंज ओलसर करा आणि नंतर फाउंडेशन आणि इतर क्रीम चेहऱ्यावर पसरवा. स्पंज तुम्हाला फाउंडेशन ब्रशपेक्षा कमी कव्हरेज देईल.

आयब्रो ब्रश

तुम्हाला तुमचे आयब्रो अगदी घनदाट करण्यासाठी हा ब्रश महत्वाचा आहे. या ब्रशने आयब्रो योग्यरित्या फिल करू शकता.