Home ताज्या घडामोडी Mumbai Fire : डोंगरीतील रहिवाशी इमारतीला भीषण आग; परिसरात धुराचे मोठे लोट!

Mumbai Fire : डोंगरीतील रहिवाशी इमारतीला भीषण आग; परिसरात धुराचे मोठे लोट!

0
Mumbai Fire : डोंगरीतील रहिवाशी इमारतीला भीषण आग; परिसरात धुराचे मोठे लोट!

मुंबई : आज सकाळी मुंबईतील अंधेरी (Andheri Fire) पश्चिम भागात आग लागल्याची घटना घडली होती. मुंबईतील आगीची घटना ताजी असताना आता पुन्हा मुंबईतच भीषण आग लागल्याची बातमी समोर आली आहे.

https://prahaar.in/2024/11/27/theft-in-hinglaj-mata-temple-along-with-jewellery-money-from-the-donation-box-also-disappeared/

मुंबईमधील डोंगरी परिसरात (Dongri Fire) अन्सारी हाईट्स नावाच्या इमारतीला भीषण आग लागली आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या पाच गाड्या आणि चार टँकरच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. या इमारतीत अनेक लोक अडकून पडल्याची शक्यता वर्तवण्यात येत असून दलाच्या मदतीने आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. तसे आग लागण्याचे कारण अद्यापही समोर आलेले नाही.