एक काकडी सोलून पातळ तुकडे करा. हे काप काही मिनिटांसाठी ओठांवर लावा. वीस मिनिटे ठेवा आणि धुवा. यामुळे ओठांचा कोरडेपणा दूर होण्यास मदत मिळते.
ओठ कोरडे आणि निर्जीव होण्यापासून वाचवण्यासाठी मध खूप प्रभावी आहे. थोडं मध घ्या आणि मध थेट ओठांवर लावा आणि नंतर काही मिनिटांनी थंड पाण्याने धुवा.
ओठ मऊ आणि चमकदार बनवण्यासाठी नारळाचे तेल अत्यंत फायदेशीर आहे. तेलाचे काही थेंब तुमच्या बोटांवर घ्या आणि ते तुमच्या कोरड्या ओठांवर लावा. काही मिनिटे सोडा आणि नंतर पाण्याने धुवा.
ओठ कोरडे होतात त्यामुळे ओठांवर तूप लावू शकता. बोटावर तुपाचा थेंब घ्या आणि थोडा वेळ ठेवा नंतर थंड पाण्याने धुवून टाका, ओठांना मॉइश्चरायझ करेल, तसेच त्वचेला ग्लो आणेल.