हिवाळ्यात त्वचा कोरडी होतेय?  'हे' घरगुती उपाय करा

 हिवाळ्यात कोरड्या हवेमुळे त्वचा रुक्ष होते. थंडीत पाणी पिण्याचे प्रमाण कमी होतं. त्यामुळे त्वचेवर परिणाम दिसू लागतात

 थंडीत त्वचा कोरडी झाल्यामुळे त्वचेला खाज सुटणं, हुळहुळणं, लाल चट्टे उठणं असे अनेक त्रास होऊ शकतात.

त्यामुळे थंडीचा ऋतू सुरू झाल्याबरोबर त्वचा कोरडी पडू नये म्हणून आवश्यक ती काळजी घेतली पाहिजे.

दुधाच्या सायीमध्ये खूप जास्त तेलकट अंश असतो. त्यामुळे थंडीतही त्वचा मऊ राहते. यात चिमूटभर हळद घालून ती चेहरा, मान, हात आणि पायाला लावावी. यामुळे कोरडी त्वचा मुलायम बनते.

दुधाची साय आणि हळद

दररोज रात्री हलक्या हाताने खोबरेल तेलाने मालिश करावे आणि सकाळी चेहरा धुवा. यामुळे त्वचा सुंदर होते.

 खोबरेल तेल

जर तुमची त्वचा खूप जास्त रुक्ष आणि कोरडी पडत असेल तर ऑलिव्ह ऑईलचा वापर उपयुक्त ठरतो. त्यासाठी अर्धा कप थंड दुधात ऑलिव्ह ऑईल मिसळा.  कापसाच्या मदतीने हे मिश्रण चेहऱ्याला लावावे. त्यामुळे त्वचेचा कोरडेपणा दूर होईल.

ऑलिव्ह ऑइल आणि दूध

बदामाचं तेल आणि मध हे दोन्ही घटक समप्रमाणात घ्या. ते मिश्रण एकत्र करुन चेहऱ्यावर लावावं आणि थोड्या वेळानं चेहरा धुऊन टाकावा. यामुळे त्वचेतला रुक्षपणा निघून जाण्यास मदत होते.

बदाम तेल आणि मध

ग्लिसरीन 

त्वचेचा कोरडेपणा दूर करण्यासाठी ग्लिसरीन फायदेशीर ठरतो.

कोरफड जेल

कोरफड चेहऱ्यावर लावल्यावर चेहरा तजेलदार होतो आणि रुक्ष पण दूर होतो.