Home ताज्या घडामोडी पती-पत्नी यांच्यात इतके असावे वयाचे अंतर

पती-पत्नी यांच्यात इतके असावे वयाचे अंतर

पती-पत्नी यांच्यात इतके असावे वयाचे अंतर

मुंबई: आचार्य चाणक्य यांनी नितीशास्त्रात पती आणि पत्नी यांच्यातील वयामध्ये किती अंतर असावे याचा उल्लेख केलेला आहे. तसेच आणखीही काही गोष्टी सांगितल्या आहेत. आचार्य चाणक्य यांच्यानुसार पती आणि पत्नी यांच्यातील वयाचे अंतर कधीही जास्त असू नये.

पती-पत्नीचे नाते हे शारिरीक आणि मानसिक आरोग्यासाठी गरजेचे आहे. आचार्य चाणक्य यांच्यामते जर दोन लोकामध्ये वयाचे अंतर जास्त असेल तर आयुष्यात काही गोष्टी त्रासदायक ठरू शकतात. आचार्य चाणक्य म्हणतात की कधीही वयस्कर पुरूषाने कमी वयाच्या मुलीशी विवाह करू नये.

या प्रकारचे लग्न दीर्घकाळ टिकू शकत नाही. पुरूष आणि महिला यांच्यातील वयाचे अंतर अधिक असल्यास जीवनात कष्ट येऊ शकतात. जर पती-पत्नी यांच्या वयातील अंतर अधिक असेल तर दोघांची मानसिकता वेगवेगळी असते. यामुळे नाते कमजोर होऊ शकते.

वयातील अंतर हे ३ ते ५ वर्षांपर्यंत असेल दोन्ही लोकांच्या मानसिकतेमध्ये जास्त फरक पडत नाही. ते एकमेकांना समजून घेतात यामुळे नाते सुदृढ होण्यास मदत होते.