Home ताज्या घडामोडी Accident news : समृद्धी महामार्गावर उभ्या ट्रकला कारची जोरदार धडक! तीनजण जागीच ठार

Accident news : समृद्धी महामार्गावर उभ्या ट्रकला कारची जोरदार धडक! तीनजण जागीच ठार

Accident news : समृद्धी महामार्गावर उभ्या ट्रकला कारची जोरदार धडक! तीनजण जागीच ठार

वाशिम : समृद्धी महामार्गावर अपघातांची मालिका सुरुच आहे. त्यातच वाशिममध्ये समृद्धी महामार्गावर कारने उभ्या असलेल्या ट्रकला धडक दिल्याची माहिती समोर आली आहे. या भीषण अपघातामध्ये तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे. वाशिमच्या मालेगाव तालुक्यातील रिधोरा इंटरचेंजजवळ हा अपघात झाला. भीषण अपघातात कार चालकासह तीनजण ठार झाल्याची माहिती मिळतेय.

याबाबत सविस्तर वृत्त असं की, वाशिमच्या समृद्धी महामार्गावर नागपूर लेनवर एक ट्रक उभा होता. मागच्या बाजूने एक भरधाव कार आली अन् तिने या ट्रकला धडक दिली. त्यामुळे या भीषण अपघातात (Samruddhi Highway Accident) कार चालकासह तिघेजण ठार झाल्याची घटना घडली आहे. अपघातग्रस्त कारमधील मृतदेह बाहेर काढण्याचं काम सुरू आहे.

अपघातग्रस्त कारमधील तीन मृतकांपैकी एक मृतदेह बाहेर काढण्यात आला आहे. तो कारच्या मागील सीटवर होता. हा मृतदेह मालेगांव ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. तर कारच्या पुढील सीटवर बसलेला चालक आणि एकाजणाचा मृतदेह कारमध्येच फसलेला असल्याची माहिती मिळतेय. आज सकाळी (३ जून) आठ वाजेच्या सुमारास हा अपघात घडला आहे. तीनही मृतदेह पुरूषांचे (Car Truck Accident) आहेत. हा अपघात समृद्धी महामार्गावर झाला आहे.