Home ताज्या घडामोडी उन्हाळ्याच्या दिवसांत अंडी फ्रीजमध्ये ठेवावीत का?

उन्हाळ्याच्या दिवसांत अंडी फ्रीजमध्ये ठेवावीत का?

उन्हाळ्याच्या दिवसांत अंडी फ्रीजमध्ये ठेवावीत का?

मुंबई: उन्हाळ्याच्या दिवसांत प्रत्येक गोष्ट फ्रीजमध्ये ठेवली जाते. अंडीही. आज जाणून घेऊया उन्हाळ्याच्या दिवसांत अंडी फ्रीजमध्ये ठेवावीत की नाही.

तज्ञांच्या मते अंडी उन्हाळ्याच्या दिवसांत बाहेर ठेवू नयेत. ती नेहमी फ्रीजमध्ये ठेवावीत. असे केल्याने अंडी लवकर खराब होत नाहीत तसेच अनेक आठवडे चांगले राहतात.

अंड्यांमध्ये साल्मोनेला नावाचे बॅक्टेरिया असू शकते. हे माणसासाठी धोकादायक आहे. साधारणपणे हे बॅक्टेरिया रक्त गरम करणारे प्राणी आणि पक्ष्यांच्या आतड्यांमध्ये आढळते. मात्र अनेकदा हे अंड्यांमध्ये आढळते.

जर तुम्ही बॅक्टेरिया असलेले अंडी खाल्ली तर त्यामुळे उल्टी, हगवण, ताप, डोकेदुखीसारख्या समस्या सतावतात. याच कारणामुळे अंडी फ्रीजमध्ये ठेवली पाहिजेत.

४ डिग्री सेल्सियस तापमानावर हे बॅक्टेरिया जिवंत राहू शकत नाही आणि त्यामुळे अंड्यामध्ये हे बॅक्टेरिया आढळत नाहीत. यासोबतच या तापमानाला अंडी नेहमी ताजी राहतात.

सोबतच अंडी खरेदी करताना त्यांची एक्सपायरी डेट जरूर चेक करा. जर तुम्ही असे करत नसाल तर हे तुमच्या आरोग्यासाठी योग्य नव्हे.