Home महामुंबई नववर्षाच्या स्वागतासाठी गिरगावात लक्षवेदी शोभायात्रा…

नववर्षाच्या स्वागतासाठी गिरगावात लक्षवेदी शोभायात्रा…

नववर्षाच्या स्वागतासाठी गिरगावात लक्षवेदी शोभायात्रा…
पारंपारिक पद्धतीने वाढली शोभायात्रेची शोभा…

हिंदू नववर्षाचा शुभारंभ असलेल्या गुढीपाडवा सण मुंबईसह राज्यभरात मोठ्या उत्साहात पार पडला. ढोल ताशांचा गजर, झांज अन् लेझीमच्या तालावर नटूनथटून पारंपारिक वेषात नववर्षांचे स्वागत करण्यात आले. मिरवणुका, शोभायात्रांमधून एकतेचा संदेश देणाऱ्या गुढ्या मुंबईत दारोदारी उभारण्यात आल्या. सालाबादप्रमाणे यंदाही मुंबईतील गिरगाव परिसरात शोभायात्रांच्या माध्यमातून मोठ्या उत्साहात, जल्लोषात नववर्षाचे स्वागत करण्यात आले. या शोभायात्रांमध्ये अनेक महिला नऊवारी, पैठणी साड्या त्यावर दागिण्यांचा साज, डोक्यावर फेटा आणि पायात कोल्हापूर चप्पल अशा एकदम मराठमोळ्या पेहरावा सहभागी झाल्या होत्या. शोभायात्रेतील मराठमोळ्या पेहरावातील महिलांची बुलेटस्वारी सर्वांचे लक्ष वेधून घेणारी ठरली.