Home ताज्या घडामोडी शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर

शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर

शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर

एकनाथ खडसेंसह रोहिणी खडसेंचेही यादीत नाव

मुंबई : शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आगामी काळात होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी ४० स्टार प्रचारकांची यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीमध्ये शरद पवार, सुप्रिया सुळे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, आमदार जितेंद्र आव्हाड आदींचा समावेश आहे. तसेच भाजपामध्ये प्रवेश करण्याची शक्यता वर्तवली जात असलेले एकनाथ खडसे आणि रोहिणी खडसे यांचा देखील यादीत समावेश करण्यात आला आहे.

शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या या स्टार प्रचारकांच्या यादीमध्ये राष्ट्रीय पातळीवर काम करणाऱ्या नेत्यांचाही समावेश करण्यात आला आहे. यामध्ये प्रामुख्याने ज्यांच्या नावाचा समावेश करण्यात आला आहे, यामध्ये पी. सी. चाको, सोनिया दुआन यांना स्टार प्रचारकांच्या यादीमध्ये स्थान देण्यात आलेले आहे. याव्यतिरिक्त आमदार राजेश टोपे, आमदार रोहित पवार प्राजक्त तनपुरे, रोहित आर. पाटील यांना स्टार प्रचारकांच्या यादीमध्ये स्थान देण्यात आलेले आहे.

एकनाथ खडसे यांच्या सून रक्षा खडसे यांना भारतीय जनता पक्षाच्या वतीने लोकसभेची उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे एकनाथ खडसे हे पुन्हा एकदा भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा सुरू आहे. रक्षा खडसे यांनी देखील तसे स्पष्ट संकेत दिले होते.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये फुट पडल्यानंतर पक्षाचे अनेक प्रमुख नेते हे अजित पवार यांच्यासोबत सत्तेमध्ये सहभागी झाले आहेत. त्यामुळे स्टार प्रचारकांच्या यादीमध्ये नेहमीच्या जुन्या नावांचा समावेश दिसत नाही. त्यामुळे शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्ट्रार प्रचारकांच्या यादीमध्ये अनेक नवीन नावांना संधी यावेळी मिळाली आहे. यामध्ये कुमारी सक्षणा सलगर यांच्यासह पूजा मोरे यांनादेखील स्टार प्रचारकांच्या यादीमध्ये स्थान मिळाले आहे. याचबरोबर महबूब शेख, जावेद हबीब यांचा देखील स्टार प्रचारकांच्या यादीमध्ये समावेश करण्यात आला आहे.