Home ताज्या घडामोडी साकीनाका येथील जरीमरी परिसरात आग

साकीनाका येथील जरीमरी परिसरात आग

साकीनाका येथील जरीमरी परिसरात आग

मुंबई : अंधेरीच्या साकीनाका परिसरात एका फॅक्टरीला आग लागल्याची घटना समोर आली आहे. या घटनेचा एक व्हिडिओ समोर आला आहे. घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, बघ्यांची गर्दी मोठ्या प्रमाणावर झाल्याने कुर्ला अंधेरी मार्गावरून जाणाऱ्या रस्त्यावर वाहतुक कोंडी झाली. आग नेमकी कशाने लागली याचे कारण अद्याप समोर आले नाही.