Home राशिभविष्य दैनंदिन राशिभविष्य Daily horoscope: दैनंदिन राशीभविष्य मंगळवार, ६ फेब्रुवारी २०२४

Daily horoscope: दैनंदिन राशीभविष्य मंगळवार, ६ फेब्रुवारी २०२४

Daily horoscope: दैनंदिन राशीभविष्य मंगळवार, ६ फेब्रुवारी २०२४

पंचांग

आज मिती पौष कृष्ण एकादशी शके १९४५. चंद्र नक्षत्र ज्येष्ठानंतर मूळ. योग व्याघात नंतर हर्षण. चंद्र राशी वृश्चिकानंतर धनू, भारतीय सौर १७ माघ शके १९४५. मंगळवार, दिनांक ६ फेब्रुवारी २०२४. मुंबईचा सूर्योदय ०७.११, मुंबईचा चंद्रोदय ०४.४५ उद्याची, मुंबईचा सूर्यास्त ०६.३४, मुंबईचा चंद्रास्त ०२.४३, राहू काळ ०३.४३ ते ०५.०८. षटतीला एकादशी, संत निवृत्तीनाथ यात्रा त्र्यंबकेश्वर.

दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope) …

मेष – मालमत्ता, जमीन-जुमला याविषयीचे व्यवहार फायदेशीर ठरतील.
वृषभ – अचानक दूरच्या प्रवासाचे नियोजन करावे लागेल.
मिथुन – कुटुंबात एखादे कार्य ठरू शकते. जोडीदाराशी संबंध सुधारतील.
कर्क – वाद-विवाद टाळणे हितकारक राहील.
सिंह – वैयक्तिक भाग्योदय होण्याची शक्यता. पर्यटन प्रवासातून आनंद मिळेल.
कन्या – व्यवसाय-धंद्यात प्रगतिकारक घटना घडतील.
तूळ – जीवन साथीबरोबर काही कारणांनी गैरसमज होण्याची शक्यता आहे.
वृश्चिक – आर्थिक आवक चांगली राहील.
धनू – नोकरीविषयक समस्या संपुष्टात येतील. आर्थिक बाब चांगली राहील.
मकर -: किरकोळ कारणांवरून वाद-विवाद होण्याची शक्यता.
कुंभ – सकारात्मक विचार ठेवणे आवश्यक आहे.
मीन – नोकरीत, व्यवसाय-धंद्यात मनासारख्या घटना घडू शकतात.