Home ताज्या घडामोडी झवेरी बाजारमधील पाच मजली इमारतीला भीषण आग

झवेरी बाजारमधील पाच मजली इमारतीला भीषण आग

झवेरी बाजारमधील पाच मजली इमारतीला भीषण आग

मुंबई : मुंबईतील झवेरी बाजार येथील चायना बाजार या पाच मजली इमारतीला रात्री एक ते दीड वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली.

मिळालेल्या माहितीनुसार, अग्निशमन दलाच्या १२ हून अधिक गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून, आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. इमारतीत अडकलेल्या ५० ते ६० लोकांना वेळीच बाहेर काढण्यात आल्याने मोठा अनर्थ टळला आहे.

दरम्यान, ही आग नेमकी कशी लागली याची माहिती अद्याप मिळू शकली नाही. स्थानिक पोलीस आणि अग्निशमन दलाचे पथक याचा तपास करत आहेत. सध्या आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवता आलेले नाही. आग विझवण्यासाठी क्रेनचाही वापर करण्यात आला आहे. इमारतीच्या आणखी एका भागात कूलिंगची प्रक्रिया सुरू झाली आहे. या भीषण आगीमुळे पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यावरील छताचा काही भाग आणि जिन्यांचा काही भाग कोसळला आहे.