Home ताज्या घडामोडी लासलगावमधील एक्सिस बँकेचे एटीएम मशीन चोरण्याचा डाव पोलिसांनी उधळला!

लासलगावमधील एक्सिस बँकेचे एटीएम मशीन चोरण्याचा डाव पोलिसांनी उधळला!

लासलगावमधील एक्सिस बँकेचे एटीएम मशीन चोरण्याचा डाव पोलिसांनी उधळला!

पाठलाग करणाऱ्या पोलिसांच्या गाडीवर मशीन फेकून भामट्यांनी केला पोबारा

महेश साळुंके

लासलगाव : लासलगाव विंचुर रोडवरील एक्सिस बँकेचे एटीएम मशीन चोरीला गेल्याची घटना समोर आली आहे. मात्र पाठलाग करणा-या पोलिसांच्या गाडीवर एक्सिस बँकेचे एटीएम मशीन फेकून भामट्यांनी पोबारा केला.

मिळालेल्या माहितीनुसार, मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी एटीएम मशीन खोलुन एर्टिगा गाङीत नेल्याची घटना सीसीटिव्हीत कैद झाली आहे. या घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी जलद चक्रे फिरवत नाकाबंदी केली.

सदर गाडीबाबत खबर मिळताच लासलगाव पोलीस ठाण्याचे बारगळ, पो. ना. योगेश शिंदे यांनी खाजगी कारमधून सदर गाडीचा पाठलाग केला असता चोरट्यांनी एटीएम मशीन नाशिक औरंगाबाद रोडवरील बोकडदरे शिवारात पाठलाग करत असलेल्या पोलिसांच्या खासगी कारवर फेकून चोरट्यांनी पोबारा केला.

याप्रकरणी पुढील तपास लासलगाव पोलीस करत असून सदर इर्टीका गाङी बाबत काही माहिती असल्यास नागरीकांनी लासलगाव पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.