आदित्यचा सिंगल फोटो वापरणे
मुंबई (प्रतिनिधी) : प्रसिद्ध अभिनेता आणि मॉडेल आदित्य सिंह राजपूतचा सोमवारी दुपारी अंधेरी येथील त्याच्या रहात्या घरी संशयितरित्या मृत्यू झाला. आदित्यच्या एका मित्राला आदित्य हा मृतावस्थेत बाथरूममध्ये आढळला. त्यानंतर त्या मित्राने आणि इमारतीच्या वॉचमॅनने आदित्यला रुग्णालयात नेले. रुग्णालयात आदित्यला मृत घोषित करण्यात आले. आदित्यच्या मृत्यूमागील कारण अजून स्पष्ट झालेले नाही.
आदित्य सिंह राजपूतने वयाच्या १७ व्या वर्षी मनोरंजन क्षेत्रातील करिअरला सुरुवात केली होती. आदित्यचा जन्म दिल्लीत झाला. त्यांचे कुटुंब उत्तराखंड येथील आहे. आई,वडील, एक मोठी बहीण असे आदित्यचे कुटुंब आहे. आदित्यच्या मृत्यूने मनोरंजन विश्वाला धक्का बसला आहे. ‘स्प्लिट्सविला’ या शोमध्ये आदित्य सिंह राजपूतने काम केले होते. तसेच त्याने काही जाहिरातींमध्ये देखील काम केले. अभिनेता आदित्य सिंह राजपूत हा त्याच्या अंधेरी भागातील अपार्टमेंटमध्ये मृतावस्थेत आढळला. मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला आहे. त्याच्या मृत्यूचा तपास चालू आहे.