Home देश डिसमिस! असा शब्द उच्चारत न्यायालयाने दिला राहुल गांधींना झटका

डिसमिस! असा शब्द उच्चारत न्यायालयाने दिला राहुल गांधींना झटका

डिसमिस! असा शब्द उच्चारत न्यायालयाने दिला राहुल गांधींना झटका

सुरत: डिसमिस.. असा एकच शब्द उच्चारत काँग्रेस नेते राहुल गांधी यांना सूरतच्या सत्र न्यायालयाने मोठा झटका दिला आहे. मोदी आडनाव वक्तव्याप्रकरणी मानहानीच्या खटल्यात सूरतच्या कनिष्ठ न्यायालयाने दिलेल्या निकालाला स्थगिती देण्यासाठी राहुल गांधी यांनी सत्र न्यायालयात याचिका दाखल केली होती. सत्र न्यायालयाने राहुल गांधी यांची ही याचिका फेटाळून लावली. यानंतर उद्याच राहुल गांधी उच्च न्यायालयात नव्याने याचिका दाखल करणार आहेत. त्यामुळे उच्च न्यायालय काय निर्णय देते याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

२३ मार्च रोजी राहुल गांधी यांना मॅजिस्ट्रेट कोर्टाने दोषी ठरवलं होतं. त्यानंतर २४ मार्च रोजी राहुल गांधी यांचं लोकसभा सदस्यत्व काढून घेण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांना खासदारांना देण्यात येत असलेला बंगला खाली करण्याची नोटीसही बजावण्यात आली होती. मॅजिस्ट्रेट कोर्टाने दिलेल्या निर्णयाविरोधात राहुल गांधी यांनी ३ एप्रिल रोजी सत्र न्यायालयात याचिका दाखल केली होती. आपल्याला सुनावण्यात आलेल्या शिक्षेला स्थगिती देण्यता यावी, अशी मागणी त्यांनी या याचिकेतून केली होती. मात्र, कोर्टाने राहुल गांधी यांना मोठा धक्का दिला आहे.