Home महाराष्ट्र कोकण साई रिसॉर्ट प्रकरणी सदानंद कदम नंतर आता प्रांताधिकारी ईडीच्या ताब्यात

साई रिसॉर्ट प्रकरणी सदानंद कदम नंतर आता प्रांताधिकारी ईडीच्या ताब्यात

साई रिसॉर्ट प्रकरणी सदानंद कदम नंतर आता प्रांताधिकारी ईडीच्या ताब्यात

ईडीच्या कारवाईमुळे ठाकरे गटाच्या नेत्यांचे धाबे दणाणले

दापोली : मुरुड येथील साई रिसॉर्ट प्रकरणी सदानंद कदम यांच्यानंतर आता ईडीने दापोलीचे तत्कालीन प्रांताधिकारी जयराम देशपांडे यांना ताब्यात घेतले आहे. ईडीने केलेल्या या कारवाईमुळे ठाकरे गटाच्या नेत्यांचे धाबे दणाणले आहेत.

यापूर्वी जयराम देशपांडे हे दापोलीतील प्रांताधिकारी होते. त्यांच्याच कारकिर्दीत साई रिसॉर्ट प्रकरणात मंजुरी मिळाली होती. देशपांडे यांच्यावर साई रिसॉर्टच्या कामासाठी बेकायदेशीर परवानगी दिल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. देशपांडे यांचे शासनाकडून निलंबन करण्यात आले होते. व त्यांची चौकशी सुरु होती. मात्र आता साई रिसॉर्ट प्रकरणात ईडीने त्यांच्याविरोधात कारवाईचा बडगा उचलला आहे.

चारच दिवसांपूर्वी माजी मंत्री अनिल परब यांचे निकटवर्तीय उद्योजक सदानंद कदम यांना ईडीने अटक केली होती. सदानंद कदम हे रामदास कदम यांचे धाकटे बंधू आहेत. मात्र ते ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांचे व्यावसायिक भागीदार आहेत.