दैनंदिन राशिभविष्य Horoscope : राशीभविष्य, दि. ०९ फेब्रुवारी २०२३ प्रहार प्रतिनिधी - February 9, 2023 12:02:01 AM 0 दैनंदिन राशीभविष्य (horoscope) … मेष-घरात एखादे छोटेसे धार्मिक कार्य ठरू शकते. वृषभ– व्यवसाय -धंद्यात नवे उपक्रम राबवाल, नवीन पर्याय मिळतील. मिथुन- विवाहयोग्य तरुण-तरुणींचे विवाह ठरतील. कर्क- भागीदारीच्या व्यवसायातून समज गैरसमज निर्माण होण्याची शक्यता. सिंह– नवीन व्यावसायिक अनुबंध जुळतील, जुनी नाती नव्याने प्रस्थापित होतील. कन्या– नोकरी, व्यवसाय -धंद्यात प्रगती आणि उन्नतीची संधी लाभेल. तूळ– हितशत्रू डोके वर काढू शकतात. सावध रहा. वृश्चिक– कामासाठी धावपळ होईल, व्यवसायिक उलाढाल वाढेल. धनू– तरुण-तरुणींना परदेशातून संधी उपलब्ध होऊ शकतात. मकर– प्रेमामध्ये पुढचे पाऊल जपून टाकावे. तीव्र विरोध होऊ शकतो. कुंभ– कुटुंबामध्ये एखाद्या मंगल कार्याच्या वाटाघाटी होऊ शकतात. मीन– वैवाहिक सौख्य मिळेल, शक्यतो प्रवास टाळावा. Post Views: 213