Home ताज्या घडामोडी मुंबई- अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर कार आणि बसचा भीषण अपघात; ४ जणांचा जागीच मृत्यू

मुंबई- अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर कार आणि बसचा भीषण अपघात; ४ जणांचा जागीच मृत्यू

मुंबई- अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर कार आणि बसचा भीषण अपघात; ४ जणांचा जागीच मृत्यू

पालघर : मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर गुजरातहून मुंबईकडे येणा-या रस्त्यावर कार आणि लग्झरी बसची धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झाला. कारचालकाचे नियंत्रण सुटल्याने कारने बसला धडक दिली आणि हा अपघात झाला.

मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील डहाणूतील महालक्ष्मीजवळ गुजरातहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर हा अपघात झाला. अपघात एवढा भीषण होता की, कारमधील सर्वच्या सर्व प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला. कारमधील सर्व प्रवाशी गुजरातच्या बारडोलीमधील राहणारे असल्याची माहिती पोलिसांनी दिली.