Home ताज्या घडामोडी जळगावला भूकंपाचा सौम्य धक्का, जीवीतहानी नाही

जळगावला भूकंपाचा सौम्य धक्का, जीवीतहानी नाही

जळगावला भूकंपाचा सौम्य धक्का, जीवीतहानी नाही

जळगाव : जळगाव जिल्हयातील भुसावळ सावदा परिसरात आज सकाळी १० वाजून ३५ मिनिटांनी भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला. नाशिक येथील पाटबंधारे विभागाच्या मेरी केंद्रात ३.३ रिश्टर स्केलचा हा धक्का नोंदवण्यात आला आहे. दरम्यान, या धक्क्यामुळे कोणतीही जीवीतहानी झाली नसल्याचे जिल्हा प्रशासनाने जाहीर केले आहे.

हतनूर धरणावरील भूकंप मापन यंत्र बंद

भुसावळ परिसरात तापी नदीवरील हतनूर या धरणावर असलेले भूकंप मापन यंत्र गेली पाच वर्ष बंद आहे. त्यामुळे या परिसरात झालेल्या भूकंपाची नोंद येथे झाली नसल्याने भूकंपाचा केंद्र बिंदू निश्चित करण्यात अडथळा येत आहे.