Home ताज्या घडामोडी तोकड्या कपड्यांमुळे उर्फी जावेद बेघर!

तोकड्या कपड्यांमुळे उर्फी जावेद बेघर!

तोकड्या कपड्यांमुळे उर्फी जावेद बेघर!

मुस्लिम मालकांचा नकार, तर वादग्रस्त ठरल्याने हिंदूनीही फिरवली पाठ

मुंबई : उर्फीला भाड्याने घर देण्यासाठी कोणीही तयार नाही. मी मुस्लिम असूनही माझ्या पेहरावामुळे मुस्लिम मालक मला घर भाड्याने देऊ इच्छित नाहीत. हिंदू मालकही मला घर देत नाहीत. मला मिळणाऱ्या राजकीय धमक्यांमुळे मुंबईत भाड्याने घर मिळणे अवघड झाले आहे, असे ट्विट करत उर्फी जावेद हीने आपल्याला मुंबईत घर मिळणे अवघड झाल्याचे म्हटले आहे.

मुंबईमध्ये घर का मिळत नाही, यामागील मोठे कारण उर्फीने स्वतः सांगितले आहे. तोकड्या कपड्यांमुळे आणि मिळणाऱ्या राजकीय धमक्यांमुळे मुंबईमध्ये राहण्यासाठी कोणी घर देत नसल्याचे उर्फीचे म्हणणे आहे.

‘मी ज्याप्रकारचे कपडे घालते, त्यामुळे मुस्लिम घर मालक मला घर भाड्याने देत नाही. हिंदू घर मालक मी मुस्लिम असल्यामुळे मला घर देत नाहीत, तर मिळणाऱ्या राजकीय धमक्यांमुळे काही घर मालक भाड्याने घर देण्यास नकार देत आहेत. मुंबईत भाड्याने अपार्टमेंट शोधणे फार अवघड झाले आहे, असे ट्विट उर्फी जावेद हिने केले आहे.

गेल्या काही दिवसांपासून भाजप नेत्या चित्रा वाघ आणि उर्फी जावेद यांच्यात वाद सुरु आहे. उर्फीचा नंगानाच महाराष्ट्रात चालू देणार नाही. अशी भूमिका चित्रा वाघ यांनी घेत उर्फीविरोधात पोलिसात तक्रारही दाखल केली होती. उर्फी जावेदनेही महिला आयोगाकडे धाव घेत चित्रा वाघ यांची तक्रार केली होती.

मात्र आता उर्फी जावेदच्या ट्विटनंतर ती पुन्हा चर्चेत आली आहे. तिच्या ट्विटवर युजर्स काही संतप्त तर काही गंमतीशीर कमेंटस करत आहेत. एक युजर कमेंट करत म्हणाला, हे चुकीचे आहे तर दुसरा युजर खंबीर राहा असे म्हणाला. अन्य एक युजरने ‘कर्म’ असे म्हणत उर्फीला ट्रोल केले.

तर एकाने, उत्तम.. त्यासर्व मुस्लिम आणि हिंदू बांधवांचे आभार हिला घर नाकारल्या बद्दल.. आता पाकिस्तान, अफगाणिस्तान मध्ये जाऊन रहा.. तुझा बाकीचा नंगा नाच तिकडे दाखव.. असा उपरोधिक सल्ला दिला आहे.