Home महाराष्ट्र ठाणे ठाण्यात मेट्रोच्या गर्डरची लोखंडी प्लेट कोसळली; महिलेचा मृत्यू

ठाण्यात मेट्रोच्या गर्डरची लोखंडी प्लेट कोसळली; महिलेचा मृत्यू

ठाण्यात मेट्रोच्या गर्डरची लोखंडी प्लेट कोसळली; महिलेचा मृत्यू

ठाणे : ठाणे शहरातील कॅडबरी सिग्नलच्या परिसरात मेट्रो-४ प्रकल्पाचे बांधकाम सुरु असताना झालेल्या अपघातामध्ये एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

ठाण्यातील येथील विवियाना मॉलच्या परिसरात असणाऱ्या उत्सव हॉटेलनजीक हा अपघात घडला. एक महिला येथून रस्ता ओलांडत होती. त्यावेळी मेट्रो प्रकल्पाच्या गर्डरची लोखंडी प्लेट खाली कोसळली. जड वजनाची ही प्लेट महिलेच्या अंगावर कोसळली आणि ती खाली दबली गेली. यामध्ये संबंधित महिलेचा मृत्यू झाला. सुनीता कांबळे (३७) असे मृत महिलेचे नाव आहे.

ठाण्यात वडाळा-घाटकोपर-कासारवडवली या मेट्रो चारच्या मार्गिकेचे काम सुरू आहे. मेट्रो गर्डरच्या सपोर्टसाठी ही प्लेट लावण्यात आली होती. गुरूवारी सकाळी सुनीता कांबळे या परिसरातून जात असताना अचानक लोखंडी प्लेट महिलेच्या अंगावर पडली.

लोखंडी प्लेटच्या प्रचंड वजनाखाली दबून या महिलेचा जागीच मृत्यू झाल्याचा अंदाज आहे. सध्या राबोडी पोलीस या घटनेचे सीसीटीव्ह फुटेज मिळवण्याचा प्रयत्न करत असून त्यांच्याकडून पुढील तपास सुरु आहे.