Home ताज्या घडामोडी आंध्रात चंद्राबाबूंच्या रॅलीत चेंगराचेंगरीत ८ जणांचा मृत्यू

आंध्रात चंद्राबाबूंच्या रॅलीत चेंगराचेंगरीत ८ जणांचा मृत्यू

0
आंध्रात चंद्राबाबूंच्या रॅलीत चेंगराचेंगरीत ८ जणांचा मृत्यू

नेल्लोर : आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि टीडीपी नेते चंद्राबाबू नायडू यांच्या रोड शोदरम्यान चेंगराचेंगरी झाली. या दुर्घटनेत ८ जणांचा मृत्यू झाला असून, अनेकजण जखमी झाले आहेत. नेल्लोर जिल्ह्यातील कंदुकुरु येथे चंद्राबाबू नायडू यांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. यानंतर काढलेल्या ‘रोड शो’दरम्यान ही घटना घडली.

नायडू यांनी आपल्या वाहनातून रोड शो करायला सुरुवात केली. यावेळी हजारो लोकांची प्रचंड गर्दी जमली होती. नायडू यांचा रोड शो सुरु असताना, लोकांमध्ये चेंगराचेंगरी झाली. अनेक लोक पाण्याच्या कॅनॉलमध्ये पडले. यामध्ये आठ जणांचा मृत्यू झाला. अनेकजण जखमी झाले. सर्व जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

या घटनेनंतर चंद्रकांतबाबू नायडू यांनी रोड शो तत्काळ थांबवला. मृतांच्या नातेवाईकांना १० लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. तर जखमींवर चांगले उपचार व्हावेत, यासाठी आपल्या पक्षातील नेत्यांना सूचना दिल्या.