Friday, May 9, 2025
Homeदेशचार दिवसांनंतर अमरनाथ यात्रेला पुन्हा सुरुवात

चार दिवसांनंतर अमरनाथ यात्रेला पुन्हा सुरुवात

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ढगफुटीनंतर ४ दिवस ब्रेक लागलेली अमरनाथ यात्रा पुन्हा सुरु झाली आहे. भाविक बालटालमार्गे बाबा बर्फानीच्या गुहेकडे रवाना होत आहेत. पहलगामनंतर मंगळवारी अमरनाथ यात्रा बालटाल मार्गे सुरू झाली आहे. ८ जुलै रोजी पवित्र गुहेजवळ ढगफुटीनंतर पूर आला होता. या अपघातात आतापर्यंत १७ जणांचा मृत्यू झाला, तर ४१ जणांचा शोध अद्यापही लागलेला नाही. बचाव पथक तीन दिवसांपासून अपघातग्रस्त भागाचा शोध घेत आहे. शुक्रवारी (८ जुलै) झालेल्या ढगफुटीनंतर अमरनाथ यात्रा थांबवण्यात आली होती. आता पहलगामचा रस्ता भाविकांसाठी खुला करण्यात आला आहे. बाबांचे भक्त पहलगाम आणि बालटाल मार्गे अमरनाथ गुहेत पोहोचत आहेत.

पवित्र अमरनाथ गुहा दक्षिण काश्मीरमध्ये ३८८० मीटर उंचीवर आहे. अमरनाथ श्राइन बोर्ड वार्षिक अमरनाथ यात्रेचे व्यवस्थापन करते. जम्मू-काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा हे त्याचे अध्यक्ष आहेत.

धोकादायक ठिकाणी तीर्थक्षेत्र शिबीर उभारल्याच्या आरोपांवर राजभवनने स्पष्टीकरण दिले आहे. पीटीआयच्या म्हणण्यानुसार, राजभवनच्या प्रवक्त्याने सांगितले की, शुक्रवारी ढगफुटी होऊन पूर आला, आणि तो अपेक्षेपेक्षा जास्त होता आणि यापूर्वी कधीही पाहिला नव्हता. अमरनाथ गुहेजवळ ढगफुटी होऊन मोठी दुर्घटना घडली. त्यामुळे अमरनाथ यात्रा स्थगित करण्यात आली होती. आता यात्रा पुन्हा सुरु करण्यात आली आहे. जम्मूमधील बेस कॅम्पमधून यात्रेकरुंचा पहिला गट अमरनाथच्या गुहेकडे जाण्यासाठी रवाना झाला आहे. यात्रा पुन्हा सुरु झाल्याने यात्रेकरुंमध्ये उत्साहाचे वातावरण आहे

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -