Home ब्रेकिंग न्यूज BMC : घाटकोपर, मानखुर्द चेंबूर परिसरातील ०६ अनधिकृत लॉजवर जप्तीची कारवाई

BMC : घाटकोपर, मानखुर्द चेंबूर परिसरातील ०६ अनधिकृत लॉजवर जप्तीची कारवाई

0
BMC : घाटकोपर, मानखुर्द  चेंबूर परिसरातील ०६ अनधिकृत लॉजवर जप्तीची कारवाई

मुंबई (विशेष प्रतिनिधी)

अनधिकृत व्यवसाय आणि नियमबाह्य बांधकामांविरोधात महानगरपालिकेकडून कारवाई सुरू आहे. या अनुषंगाने, एम पूर्व विभागामार्फत घाटकोपर-मानखुर्द जोड मार्गावरील टी जंक्शन, आंबेडकर नगर, मंडाळा, मानखुर्द तसेच चेंबूर येथील सुंदरबाग, सायन-ट्रॉम्बे मार्ग आणि शिवपूजा रेसिडेन्सी परिसरातील एकूण ०६ अनधिकृत लॉजवर सलग दोन दिवस जप्तीची कारवाई करण्यात आली आहे.

गुरुवारी २६ नोव्हेंबर २०२६ रोजी टी जंक्शन, घाटकोपर-मानखुर्द जोड मार्ग, आंबेडकर नगर, मंडाळा, मानखुर्द परिसरातील एकूण ४ अनधिकृत लॉजवर कारवाई करण्यात आली. यावेळी संबंधित लॉजमधील विविध साहित्य जप्त करण्यात आले. तसेच, पाणी व वीज जोडण्यांचे मीटर कापण्यात आले. (BMC)

https://www.prahaar.in/2026/11/29/16153-banners-torn-down-in-mumbai-over-51-days/

शुक्रवारी २७ नोव्हेंबर २०२६ रोजी चेंबूर येथील सुंदरबाग, सायन-ट्रॉम्बे मार्ग आणि शिवपूजा रेसिडेन्सी परिसरातील ०२ अनधिकृत लॉजवर जप्तीची संयुक्त कारवाई करण्यात आली. या कारवाईदरम्यान मोठ्या प्रमाणात साहित्य जप्त करण्यात आले. तसेच , पाणी व वीज जोडण्यांचे मीटर निष्क्रिय करण्यात आले.

उप आयुक्त (परिमंडळ ५) संध्या नांदेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच ‘एम पूर्व’ विभागाच्या सहायक आयुक्त अलका ससाणे यांच्या देखरेखीखाली ही कारवाई करण्यात आली. दोन्ही दिवसांच्या कारवाईदरम्यान ‘एम पूर्व’ विभागातील संबंधित अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी उपस्थित होते. तसेच, पोलिस बंदोबस्त तैनात होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here