Home ब्रेकिंग न्यूज Ahilyanagar Crime : नगरमध्ये 550 किलो गोमांस जप्त

Ahilyanagar Crime : नगरमध्ये 550 किलो गोमांस जप्त

0
Ahilyanagar Crime : नगरमध्ये 550 किलो गोमांस जप्त

अहिल्यानगर : शहरातील मुकुंदनगर परिसरात सुरू असलेल्या अवैध गोमांस विक्रीवर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकून मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत ५५० किलो गोमांसासह एकूण १ लाख ६६ हजार ६०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एका आरोपीस ताब्यात घेण्यात आले आहे, तर दुसरा आरोपी फरार झाला आहे. ही कारवाई २७ नोव्हेंबर २०२६ रोजी करण्यात आली.

अहिल्यानगर जिल्ह्यातील अवैध व्यावसायिकांवर कारवाई करण्याचे आदेश पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी स्थानिक गुन्हे शाखेला दिले होते. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संतोष मुटकुळे यांनी पोलीस अंमलदार संदीप पवार, अरविंद भिंगारदिवे, शाहीद शेख आणि अमृत आढाव यांचे पथक तयार करून अवैध धंद्यांची माहिती काढून कारवाई करण्याच्या सूचना देत पथकास रवाना केले.

दिनांक २७ नोव्हेंबर २०२६ रोजी तपास पथक भिंगार कॅम्प पोलिस स्टेशनच्या हद्दीत अवैध धंद्यांची माहिती घेत असताना पथकाला गोपनीय माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीनुसार, मुकुंदनगर येथील रहिवासी इरफान कुरेशी हा संजोगनगर, मुकुंदनगर येथे नूर बानु शेख यांच्या घरावरील पत्र्याच्या खोलीमध्ये गोमांसाची विक्री करत होता. या माहितीच्या आधारे पथकाने पंचांच्या उपस्थितीत नमूद ठिकाणी जाऊन खात्री केली. त्या वेळी एक इसम गोवंशीय जनावरांची कत्तल केलेल्या गोमांसाचे तुकडे करताना आढळून आला.

https://www.prahaar.in/2026/11/28/a-schoolgirl-was-assaulted-after-she-plucked-jujube-fruits-from-a-farm-sparking-an-uncontrollable-outburst-of-rage-from-the-farm-owne/

पथकाने घटनास्थळावरून इरफान एजाज कुरेशी (वय ४०, रा. अब्दुल रजा मस्जीदजवळ, संयोगनगर, मुकुंदनगर, अहिल्यानगर) यास ताब्यात घेतले. घटनास्थळाची तपासणी करून पथकाने १ लाख ६५ हजार रुपये किमतीचे ५५० किलो गोमांस, ६०० रुपये किमतीचे दोन सत्तुर व दोन चाकू आणि १ हजार रुपये किमतीचा एक इलेक्ट्रिक काटा असा एकूण १ लाख ६६ हजार ६०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.

ताब्यात घेतलेल्या आरोपीकडे जप्त मुद्देमालाबाबत अधिक विचारपूस करण्यात आली. त्या वेळी हा मुद्देमाल पप्पू फैयाज कुरेशी (रा. झेंडीगेट, अहिल्यानगर, फरार) याच्या मालकीचा असल्याची माहिती त्याने दिली. या प्रकरणी भिंगार कॅम्प पोलीस स्टेशन येथे महाराष्ट्र पशुसंरक्षण अधिनियमनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here