ऑफिसमध्ये काम करताना एनर्जी टिकवून ठेवायचीय? मग खाण्यापिण्याची 'ही' वेळ अजिबात चुकवू नका!

सकाळी 8 ते 9 - नाश्ता कधीही चुकवू नका ऑफिसला जाण्याआधी पोटभर हेल्दी नाश्ता करा. पोहे, उपमा, ओट्स, अंडी किंवा फळं घ्या. रिकाम्या पोटी काम केलं तर थकवा आणि डोकेदुखी येते.

सकाळी 11 वाजता - हलका स्नॅक्स ब्रेक नाश्ता आणि जेवणाच्या मध्ये एक फळ, मूठभर बदाम-शेंगदाणे किंवा दही घ्या. यामुळे एनर्जी टिकून राहते आणि जास्त भूक लागत नाही.

दुपारी 1 ते 1:30 - मुख्य जेवण दुपारचं जेवण वेळेवर घ्या. घरचा डबा सर्वात उत्तम - पोळी, भाजी, डाळ-भात आणि सलाड. बाहेरचं तळलेलं, जड जेवण रोज टाळा.

संध्याकाळी 4 वाजता - चहा + हलका खाऊ 4 वाजता येणारी झोप घालवायला चहा-कॉफीसोबत बिस्कीट, चणे किंवा मखाना घ्या. जास्त गोड चहा आणि वेफर्स टाळा.

रात्री 7:30 ते 8:30 - हलकं जेवण ऑफिसवरून आल्यावर खूप उशिरा आणि खूप जड जेवू नका. सूप, सलाड, खिचडी किंवा 2 पोळी-भाजी पुरेशी आहे. झोपायच्या 2 तास आधी जेवण संपवा.

दिवसातून 4-5 वेळा जेवण आणि प्रत्येक तासाला पाणी. डेस्कवर बाटली ठेवा. जेवताना मोबाईल नको, सावकाश चावून खा, पोट 80% भरलं की थांबा