Home राजकीय Jitendra Awhad : मतदारसंघ पुनर्रचनेला राष्ट्रवादी शरद पवार गटाचा पाठिंबा, जितेंद्र आव्हाडांची माहिती

Jitendra Awhad : मतदारसंघ पुनर्रचनेला राष्ट्रवादी शरद पवार गटाचा पाठिंबा, जितेंद्र आव्हाडांची माहिती

0
Jitendra Awhad : मतदारसंघ पुनर्रचनेला राष्ट्रवादी शरद पवार गटाचा पाठिंबा, जितेंद्र आव्हाडांची माहिती
Sharad Pawar And Jitendra Award

मुंबई : मतदारसंघ पुनर्रचना अर्थात डिलिमिटेशनच्या विधेयकाला राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचा पाठिंबा असल्याचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी शुक्रवारी स्पष्ट केले. मतदारसंघ पुनर्रचना ही घटनात्मक प्रक्रिया असून ती करावीच लागते, त्याला पर्याय नाही, असे शरद पवार यांनी अनौपचारिक चर्चेत सांगितल्याचा दावा आव्हाड यांनी केला. ‘पवारसाहेब माझे दैवत आहेत. त्यांची जी भूमिका आहे, तीच माझी भूमिका आहे,’ असे सांगत डिलिमिटेशनला पाठिंबा देण्याचा निर्णय झाल्याचेही त्यांनी जाहीर केले. ( Jitendra Awhad)

https://www.prahaar.in/2026/11/27/four-hour-jumbo-block-on-western-railway-at-midnight-fast-local-trains-between-santacruz-and-mahim-to-run-on-slow-lines/

शरद पवार यांच्यावर ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू असून, आव्हाड यांनी शुक्रवारी रुग्णालयात जाऊन त्यांची भेट घेतली. प्रकृतीची विचारपूस केल्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी मतदारसंघ पुनर्रचनेबाबत पक्षाची भूमिका विचारली असता आव्हाड यांनी शरद पवार यांच्याशी झालेल्या चर्चेचा संदर्भ दिला. मतदारसंघांची पुनर्रचना आवश्यक असते, असे पवार यांनी आपल्याला अनौपचारिक चर्चेत सांगितल्याचे ते म्हणाले. आठ खासदारांना सोबत घेऊन सुप्रिया सुळे यांनी घेतलेला निर्णय अंतिम असेल, असे त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, शरद पवार यांना उद्या किंवा परवा रुग्णालयातून डिस्चार्ज मिळण्याची शक्यता असल्याचेही आव्हाड यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here