Home क्रीडा 20 डिसेंबरला मैदानात उतरणार मेस्सी! टेवेझच्या निरोपाच्या सामन्यात तारे-तारकांची मांदियाळी; फुटबॉल चाहत्यांसाठी सुवर्णसंधी

20 डिसेंबरला मैदानात उतरणार मेस्सी! टेवेझच्या निरोपाच्या सामन्यात तारे-तारकांची मांदियाळी; फुटबॉल चाहत्यांसाठी सुवर्णसंधी

0
20 डिसेंबरला मैदानात उतरणार मेस्सी! टेवेझच्या निरोपाच्या सामन्यात तारे-तारकांची मांदियाळी; फुटबॉल चाहत्यांसाठी सुवर्णसंधी
20 डिसेंबरला मैदानात उतरणार मेस्सी! टेवेझच्या निरोपाच्या सामन्यात तारे-तारकांची मांदियाळी; फुटबॉल चाहत्यांसाठी सुवर्णसंधी (Photo: Facebook)

जागतिक फुटबॉल विश्वासाठी एक अत्यंत रोमांचक आणि भावनिक बातमी समोर आली आहे. अर्जेंटिनाचा महान फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी आपला माजी सहकारी कार्लोस टेवेझ याच्या सन्मानार्थ आयोजित करण्यात आलेल्या निरोपाच्या सामन्यात सहभागी होणार आहे. या वृत्ताला आयोजकांनी अधिकृत दुजोरा दिला असून, हा खास सामना 20 डिसेंबर रोजी खेळवला जाणार आहे. या सामन्यामुळे फुटबॉलप्रेमींमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली असून मैदानावर तारे-तारकांचा मोठा मेळा पाहायला मिळणार आहे.

‘अपाचे’ या टोपणनावाने प्रसिद्ध असलेल्या टेवेझ ने 2022 मध्ये व्यावसायिक फुटबॉलमधून निवृत्ती घेतली होती. आपल्या दीर्घ आणि यशस्वी कारकिर्दीत त्याने मँचेस्टर सिटी, मँचेस्टर युनायटेड आणि जुव्हेंटस यांसारख्या जगप्रसिद्ध क्लबकडून खेळण्याचा मोठा अनुभव घेतला आहे. 42 वर्षीय टेवेझने आपल्या बालपणीच्या बोका ज्युनियर या क्लबकडून खेळताना आपल्या खेळाडू कारकिर्दीचा शेवट केला होता. गेल्या वर्षी त्याने आपल्या विदाई सामन्यात मेस्सी आणि मँचेस्टर युनायटेड मधील त्याचा माजी सहकारी ख्रिस्तियानो रोनाल्डो यांनी एकमेकांविरुद्धच्या संघांकडून खेळावे, अशी इच्छा व्यक्त केली होती.

https://www.prahaar.in/2026/11/27/ind-vs-nz-2nd-test-jasprit-bumrah-changes-his-run-up-during-the-match-bowls-in-a-style-from-11-years-ago-watch-video/

आयोजकांनी गुरुवारी इन्स्टाग्रामवर वर खास पोस्ट करत या ऐतिहासिक सहभागाची माहिती दिली. या पोस्टमध्ये म्हटले आहे की, “अपाचेच्या अखेरच्या सामन्यात जगातील सर्वोत्तम खेळाडूचे स्वागत करणे आमच्यासाठी खऱ्या अर्थाने सन्मानाची बाब असेल.” या निरोपाच्या सामन्यासाठी रिओ फर्डिनांड, सर्जियो अग्युरो, लिएंड्रो परेडेस, जियानलुइगी बुफोन आणि मार्टिन पालेर्मो यांच्यासह अनेक दिग्गज फुटबॉलपटूंच्या सहभागाचीही पुष्टी करण्यात आली आहे.

हा भव्य सामना बोका ज्युनियर्सच्या प्रतिष्ठित ला बॉम्बोनेरा स्टेडियमवर रंगणार आहे. या स्टेडियमची वातावरणातील ऊर्जा आणि चाहत्यांचा जल्लोष नेहमीच खास असतो. त्यामुळे एकाच मैदानावर अनेक दिग्गज खेळाडूंना पुन्हा एकत्र खेळताना पाहणे हा फुटबॉल चाहत्यांसाठी 1 अविस्मरणीय क्षण ठरणार आहे. 20 डिसेंबर रोजी होणाऱ्या या सामन्याकडे आता संपूर्ण जगाचे लक्ष लागून राहिले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here