Home ब्रेकिंग न्यूज Dry Fruits Benefits: बदाम, अक्रोड, मनुका अन् काजू… रोज सुकामेवा खाल्ल्याने शरीराला काय फायदे होतात?

Dry Fruits Benefits: बदाम, अक्रोड, मनुका अन् काजू… रोज सुकामेवा खाल्ल्याने शरीराला काय फायदे होतात?

0
Dry Fruits Benefits: बदाम, अक्रोड, मनुका अन् काजू… रोज सुकामेवा खाल्ल्याने शरीराला काय फायदे होतात?
Dryfruits Benefits

Dry Fruits Benefits: हिवाळ्यात तुळशीचे लग्न झाले की लग्नसराईला सुरुवात होते आणि वेगवेगळ्या खाद्यपदार्थांची त्यात रेलचेल असते. त्यामुळे अनेकवेळा आपल्या आहाराकडे दुर्लक्ष होतं. या दिवसांत कधी गोड पदार्थ, तर कधी तळलेले पदार्थ खाण्याचं प्रमाण वाढतं. अशा वेळी रोजच्या आहारात एक पौष्टिक पदार्थ समाविष्ट केल्यास आरोग्याला अनेक फायदे मिळू शकतात.

रोज मूठभर सुकामेवा (Nuts) खाणं आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकतं. त्यामुळे सुकामेवा खाण्याचे नेमके फायदे काय?

1. सुकामेव्यामध्ये फायबर आणि इतर पोषक घटक असतात. त्यामुळे आतड्यांच्या आरोग्याला फायदा होऊ शकतो.

2. बदाम, अक्रोड,अंजीर,मनुका यांसारखा सुकामेवा खाल्ल्याने वजन कमी होण्यास मदत होतेच.

3. सुकामेव्यामध्ये व्हिटॅमिन ई असतं. हे एक अँटीऑक्सिडंट असून लिव्हरच्या पेशींचं संरक्षण करण्यास मदत करू शकतं.

4. सुकामेव्याचे सेवन पित्ताशयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकते. तसेच पित्ताशयात खडे होण्याचा धोका कमी होण्यास मदत होऊ शकते.

5. सुकामेव्यामध्ये फायबर आणि कॅल्शियम असतं. त्यामुळे पचनक्रियेला मदत होऊ शकते.

6. सुकामेव्यामध्ये असलेले पोषक घटक मेंदूच्या आरोग्यासाठी उपयुक्त असतात. त्यामुळे स्मरणशक्ती आणि मेंदूच्या कार्याला फायदा होऊ शकतो.

7. जर तुम्ही ड्रायफ्रुट्स भिजवून खाल्ले तर तुमची पचनक्रिया निरोगी राहते. याशिवाय ड्रायफ्रूट्स रात्रभर भिजवून सकाळी खाल्ल्याने तुमचे आरोग्य सुधारते. यामुळे बद्धकोष्ठतेच्या समस्येपासून आराम मिळतो.

https://www.prahaar.in/2026/11/27/tu-aahes-na-an-emotional-glimpse-of-a-marathi-film-on-the-iffi-stage-tu-aahes-na-receives-a-positive-response-from-the-audience/

कोणत्या सुकामेव्यामध्ये किती पोषक घटक असतात?

बाजारात बदाम, काजू, अक्रोड, पिस्ता, शेंगदाणे असे अनेक प्रकारचे सुकामेवे उपलब्ध मिळतात. प्रत्येकामध्ये ऊर्जा, प्रथिने आणि स्निग्ध पदार्थांचे (Fat) प्रमाण वेगवेगळे असते.

आहारात सुकामेव्याचा समावेश करा!

रोजच्या आहारात योग्य प्रमाणात सुकामेव्याचा समावेश केल्यामुळे आरोग्यासाठी फायदा होतो. तसेच संतुलित आहार आणि नियमित व्यायामही तितकेच महत्त्वाचे आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here