Home ब्रेकिंग न्यूज Pune News : पुण्यातील कॅम्प परिसरात बेवारस बॅगमुळे खळबळ, बॉम्बशोधक पथकाची तातडीने धाव

Pune News : पुण्यातील कॅम्प परिसरात बेवारस बॅगमुळे खळबळ, बॉम्बशोधक पथकाची तातडीने धाव

0
Pune News : पुण्यातील कॅम्प परिसरात बेवारस बॅगमुळे खळबळ, बॉम्बशोधक पथकाची तातडीने धाव

पुणे : पुण्यातील कॅम्प परिसरातील 15 ऑगस्ट चौकाजवळ एका बँकेबाहेर बेवारस बॅग आढळल्याने शुक्रवारी काही काळ घबराट पसरली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. खबरदारीचा उपाय म्हणून बॉम्ब शोधक व नाशक पथकाला (BDDS) बोलावून बॅगेची तपासणी करण्यात आली.

https://www.prahaar.in/2026/11/27/tu-aahes-na-an-emotional-glimpse-of-a-marathi-film-on-the-iffi-stage-tu-aahes-na-receives-a-positive-response-from-the-audience/

बँकेच्या कर्मचाऱ्यांनी दिली पोलिसांना माहिती

मिळालेल्या माहितीनुसार, बँकेच्या कर्मचाऱ्यांना आवाराबाहेर एक बेवारस बॅग आढळली. त्यांनी तातडीने पोलिसांना याबाबत कळवले. माहिती मिळताच पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. बॅगेमध्ये संशयास्पद वस्तू किंवा स्फोटक पदार्थ असण्याची शक्यता लक्षात घेऊन बीडीडीएस पथकालाही पाचारण करण्यात आले.

बीडीडीएस पथकाकडून बॅगेची तपासणी

तपासणी सुरू असताना खबरदारी म्हणून पोलिसांनी परिसरातील नागरिकांची ये-जा रोखली आणि आजूबाजूचा भाग काही काळासाठी बंद केला. त्यामुळे गजबजलेल्या कॅम्प परिसरात नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Prahaar Newsline (@prahaarnewsline)

मात्र, बीडीडीएस पथकाने केलेल्या तपासणीत बॅगेमध्ये कोणतीही संशयास्पद किंवा धोकादायक वस्तू आढळली नाही. तसेच बॉम्ब किंवा स्फोटक पदार्थ असल्याची शक्यताही फेटाळण्यात आली. तपासणी पूर्ण झाल्यानंतर पोलिसांनी परिसरातील निर्बंध हटवले आणि जनजीवन पूर्ववत झाले.

या घटनेमुळे काही काळ परिसरात तणाव निर्माण झाला होता. मात्र, तपासणीत धोका नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here