Home ब्रेकिंग न्यूज Nilesh Rane on Sanjay Raut : ‘परिसीमन’ देशद्रोह असेल तर काँग्रेसलाही देशद्रोही ठरवा; आमदार निलेश राणेंचा संजय राऊतांवर घणाघात

Nilesh Rane on Sanjay Raut : ‘परिसीमन’ देशद्रोह असेल तर काँग्रेसलाही देशद्रोही ठरवा; आमदार निलेश राणेंचा संजय राऊतांवर घणाघात

0
Nilesh Rane on Sanjay Raut : ‘परिसीमन’ देशद्रोह असेल तर काँग्रेसलाही देशद्रोही ठरवा; आमदार निलेश राणेंचा संजय राऊतांवर घणाघात

सुप्रिया सुळेंच्या मुख्यमंत्रीपदाच्या चर्चेची उडवली खिल्ली

सिंधुदुर्ग : शिवसेना (शिंदे गट) आमदार निलेश राणे यांनी आज सिंधुदुर्गात माध्यमांशी संवाद साधताना राज्यातील आणि देशातील विविध महत्त्वाच्या राजकीय मुद्द्यांवर जोरदार फटकेबाजी केली. यावेळी त्यांनी मनसे नेते संदीप देशपांडे यांनी समोर आणलेल्या पैशांच्या बॅगेच्या व्हिडिओची फॉरेन्सिक तपासणी करण्याची मागणी केली, तसेच संजय राऊत, काँग्रेस आणि शक्तिपीठ महामार्गाच्या मुद्द्यावर आपली रोखठोक भूमिका मांडली.

संदीप देशपांडेंच्या व्हिडिओची फॉरेन्सिक तपासणी करा

https://www.prahaar.in/2026/11/27/womens-reservation-delimitation-bill-lok-sabha-nda-number-game-360/

मनसे नेते संदीप देशपांडे यांनी व्हायरल केलेल्या पैशांच्या बॅगेच्या व्हिडिओवर बोलताना निलेश राणे यांनी थेट फॉरेन्सिक तपासणीची मागणी केली. हा व्हिडिओ खरा आहे की बनावट, हे तपासणे अत्यंत गरजेचे असल्याचे ते म्हणाले. इतकेच नाही तर, दादरमधील मनसेच्या ‘राजगड’ कार्यालयात झालेल्या कथित मारहाणीचा व्हिडिओही तपासला जावा आणि त्या घटनेत नेमके काय घडले होते, याचीही सखोल चौकशी व्हावी, असा पलटवार निलेश राणे यांनी केला.

सुप्रिया सुळेंच्या मुख्यमंत्रीपदाच्या चर्चेवरून संजय राऊतांना टोला

सुप्रिया सुळे मुख्यमंत्री होणार असल्याच्या चर्चांवर बोलताना निलेश राणे यांनी संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला. ही चर्चा नेमकी कुठून सुरू झाली याची आपल्याला माहिती नाही आणि अशी कोणतीही अधिकृत चर्चा ऐकलेली नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. आम्ही युतीचे घटक पक्ष आहोत; जर अशी काही राजकीय हालचाल सुरू असेल तर आम्हाला नक्कीच समजेल. कोणताही आधार नसलेल्या बातमीला उत्तर देण्याची गरज काय, असे म्हणत त्यांनी संजय राऊतांना उपचारासाठी भरती करण्याची गरज असल्याचा खोचक टोला लगावला.

‘परिसीमनाला देशद्रोह म्हणत असाल तर काँग्रेसलाही देशद्रोही ठरवा’

मतदारसंघ पुनर्रचना अर्थात परिसीमन विधेयकावरून सुरू असलेल्या विरोधावर निलेश राणे यांनी संजय राऊत आणि काँग्रेसचा समाचार घेतला. परिसीमन ही काही नवीन प्रक्रिया नसून काँग्रेसच्या काळातही ती झाली होती. २००९ मध्ये काँग्रेसच्या कार्यकाळात झालेल्या परिसीमनानंतरच आपण खासदार झालो होतो, याची आठवण त्यांनी करून दिली. लोकसंख्या आणि मतदार यादीतील बदलांमुळे परिसीमन आवश्यक आहे. जर तुम्ही परिसीमनाला देशद्रोह म्हणत असाल, तर आधी काँग्रेसलाही देशद्रोही ठरवा, असे आव्हान त्यांनी राऊतांना दिले. विधेयकावर काही आक्षेप असतील तर ते संसदेत मांडावेत, असे सांगतानाच सभागृहाचे कामकाज चालू न देण्यावरून त्यांनी राहुल गांधींवरही टीका केली.

उत्तर प्रदेश आणि गोव्यातही शिवसेना निवडणूक लढवणार

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची लोकप्रियता केवळ महाराष्ट्रापुरती मर्यादित राहिली नसून ती राज्याबाहेरही मोठ्या प्रमाणावर वाढली असल्याचा दावा निलेश राणे यांनी केला. शिवसेना आता राज्याबाहेरही आपला विस्तार करत असून, आगामी काळात उत्तर प्रदेशसोबतच गोव्यातही निवडणुका लढवण्याची तयारी सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here