Ramayana Movie Box Office: रणबीर कपूरचा रामायण हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सर्व रेकॉर्ड ब्रेक करीत आहे. बॉक्स ऑफिसवर अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा 2: द रूल’ला मागे टाकून रामायण आता बाहुबली ला टक्कर देण्याच्या तयारीत आहे. एस.एस. राजामौली यांच्या ‘बाहुबली 2: द कन्क्लुजन’शी रामायण आता स्पर्धा करीत असल्याचे बोलले जात आहे.
बाहुबली 2 हा चित्रपट जगभरातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या भारतीय चित्रपटांच्या यादीत आजही अग्रस्थानी आहे. हा चित्रपट भारतातही ₹1,000 कोटींच्या निव्वळ कमाईचा टप्पा गाठण्याच्या जवळ पोहोचत आहे. त्याच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनची तुलना आता रामायण या चित्रपटाशी केली जात आहे.
रामायणचे आतापर्यंतचे जगभरातील कलेक्शन
चित्रपट प्रदर्शनाच्या 22 व्या दिवशी, रामायणने 15,418 शोजमधून ₹9.65 कोटींची कमाई केली आहे. हिंदीमध्ये 22 व्या दिवशी ₹6.75 कोटी, मल्याळममध्ये ₹1.00 कोटी, तर कन्नडमध्ये ₹85 लाख, तसेच तमिळमध्ये ₹75 लाख आणि तेलगूमध्ये ₹30 लाख कमाई केली आहे. यासह, भारतातील आतापर्यंतचे एकूण ग्रॉस कलेक्शन ₹1,185.00 कोटींवर पोहोचले आहे आणि एकूण नेट कलेक्शन ₹ 992.10 कोटींवर पोहोचले आहे.
परदेशात,या चित्रपटाने 22 व्या दिवशी ₹10.00 कोटी कमावले, ज्यामुळे तेथील त्याची एकूण कमाई ₹592.00 कोटी झाली आहे. यामुळे चित्रपटाची जगभरातील एकूण कमाई ₹1,777.00 कोटी झाली आहे. चित्रपट आता 1000 कोटी रुपयांच्या टप्प्याच्या अगदी जवळ पोहोचला आहे आणि उद्यापर्यंत तो हा टप्पा ओलांडेल अशी अपेक्षा आहे. या चित्रपटाच्या कमाईत थोडी घट झाली असली तरी, चित्रपटाने जगभरात १७०० कोटी रुपयांपेक्षा जास्त कमाई केली आहे.
रामायण या चित्रपटाने 21 व्या दिवशी ‘पुष्पा 2’ ची ₹ 1,742.10 कोटींची जगभरातील एकूण कमाई पार केली. त्यांनतर आता ‘रामायण’ आणखी एका मोठ्या लक्ष्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. या चित्रपटाने जगभरात ₹1,761 कोटींचा टप्पा आधीच पार केला असून, आता त्याची स्पर्धा ‘बाहुबली 2: द कन्क्लुजन’ सोबत आहे.
एस.एस. राजामौली दिग्दर्शित चित्रपटाने त्याच्या थिएटरमधील प्रदर्शनादरम्यान जगभरात ₹1,788.06 कोटींची कमाई केली. याचा अर्थ असा की, ‘बाहुबली 2’ च्या लाईफटाईम कलेक्शनची बरोबरी करण्यासाठी, ‘रामायणा’ला आपल्या सध्याच्या जगभरातील एकूण कमाईमध्ये अंदाजे ₹11 कोटींची भर घालावी लागणार आहे. ‘रामायण’ने आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या बॉक्स ऑफिस यशोगाथांमध्ये एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठला आहे. हा आतापर्यंतचा चौथा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे.
सर्वाधिक कमाई करणारे चित्रपट
दंगल – ₹2,070.30 कोटी
धुरंधर: द रिव्हेंज – ₹1,850.88 कोटी
बाहुबली 2: द कन्क्लुजन – ₹1,788.06 कोटी
सध्या ‘रामायण’साठी ‘बाहुबली 2’ हे सर्वात जवळचे लक्ष्य आहे. मात्र, या यादीत आणखी वर जाण्यासाठी चित्रपटाला चित्रपटगृहांमधील आपली पकड कायम ठेवावी लागेल.