मुंबई: नितेश तिवारी दिग्दर्शित, ‘रामायण’ चित्रपटामध्ये रणबीर कपूर, साई पल्लवी आणि यश यांच्यासह मराठी, बॉलिवूड, टॉलिवूड आणि हॉलिवूड इंडस्ट्रीतील अनेक कलाकार आपल्याला काम करताना दिसत आहे. चित्रपटातील कलाकारांच्या दमदार अभिनयाने सजलेल्या ह्या ‘रामायण’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. चित्रपट प्रदर्शित होऊन 20 दिवस झाले आहेत, तरी सुद्धा या चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई पाहायला मिळत आहे. चित्रपटाने 20 दिवसांमध्ये 1756 कोटींची कमाई करत चित्रपटाने ‘अवतार’ आणि ‘एंडगेम’चेही रेकॉर्ड मोडले आहेत. विशेष म्हणजे, पहिल्या दिवशी किंवा पहिल्या वीकेंडला कोणताही मोठा विक्रम न करता, पहिल्या सोमवारपासून या चित्रपटाने अशी काही गती पकडली की चित्रपटाने 20 दिवसांत 20 ऐतिहासिक रेकॉर्ड आपल्या नावे केले आहेत.
https://www.prahaar.in/2026/11/26/now-take-a-selfie-with-a-character-from-your-favorite-show-jiostars-your-star-moment-initiative/
रणबीर कपूर आणि साई पल्लवीच्या ‘रामायण’ चित्रपटाने 20 दिवसांत रचलेले 20 महाविक्रम कोणते?
- 1756 कोटी रुपयांच्या कमाईसह हा चित्रपट 2026 मधील सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटाच्या यादीमध्ये आहे. अद्याप चित्रपटाने ‘धुरंदर: द रिव्हेंज’चा विक्रम मोडित काढलेला नाही.
- परदेशात 582 कोटी रुपये कमावून 2026 मधील नंबर वन ओव्हरसीज चित्रपट ठरला आहे.
- चित्रपट रिलीज झाल्यानंतर आठवड्यातील पहिल्याच सोमवारी 128 कोटींची कमाई करत इतिहास रचला; आजवर कोणत्याही चित्रपटाने सोमवारच्या दिवशी 80 कोटींचा टप्पा पार केला नाही.
- चित्रपट रिलीज झाल्यानंतरच्या दुसऱ्या शनिवारी 87 कोटी रुपयांचे रेकॉर्डब्रेक कलेक्शन केले.
- चित्रपट रिलीज झाल्यानंतरच्या दुसऱ्या रविवारी 90 कोटी कमावत याने ‘धुरंदर: द रिव्हेंज’चा विक्रम मोडीत काढला.
- चित्रपट रिलीज झाल्यानंतरच्या तिसऱ्या रविवारी 42 कोटींहून अधिक कमाई करत चित्रपटाने आपल्या नावावर नवा विक्रम प्रस्थापित केला.
- चित्रपट रिलीज झाल्यानंतर सलग 7 दिवस दररोज 100 कोटींहून अधिक कमाई करणारा एकमेव चित्रपट ठरला आहे.
- अवघ्या 18 दिवसांत चित्रपटाने 700 कोटींचा टप्पा गाठणारा हा सर्वात वेगवान चित्रपट आहे.
- जगभरात 56,000 स्क्रीन्सवर प्रदर्शित होऊन या चित्रपटाने ‘अवतार’ आणि ‘अॅव्हेंजर्स: एंडगेम’लाही मागे टाकले.
- 100 हून अधिक देशांमध्ये रिलीज होणारा हा पहिलाच भारतीय चित्रपट आहे.
- जगभरातल्या तब्बल 40 भाषांमध्ये प्रदर्शित होण्याचा अनोखा विक्रम या चित्रपटाने केला आहे.
- 4000 कोटी रुपयांचं बजेट असलेला हा चित्रपट भारतीय सिनेसृष्टीतील सर्वाधिक महागडा चित्रपट ठरला आहे.
- रणबीर कपूरच्या करिअरमधील सर्वाधिक कमाई करणारा हा पहिला चित्रपट ठरला आहे.
- साऊथ सुपरस्टार यशच्या कारकिर्दीतील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट म्हणून या चित्रपटाने नोंद केली आहे.
- केरळमध्ये सर्वाधिक कमाई करणारा हा पहिलाच हिंदी चित्रपट ठरला आहे.
- कर्नाटक राज्यात सर्वाधिक व्यवसाय करणारा हिंदी चित्रपट बनण्याचा मान या चित्रपटाला मिळाला आहे.
- उत्तर अमेरिकेत सर्वाधिक कमाई करणारा हा भारतीय चित्रपट ठरला आहे.
- नेपाळमध्ये सर्वाधिक कमाई करणारा हा भारतीय चित्रपट बनला आहे.
- ‘बुक माय शो’वर 6.60 कोटी तिकिटांच्या विक्रीसह सर्वाधिक तिकीट विक्री होणारा भारतीय चित्रपट ठरला आहे.
- अवघ्या 20 दिवसांत सर्वाधिक कमाई करणाऱ्या भारतीय चित्रपटांच्या यादीत या चित्रपटाने चौथे स्थान पटकावले आहे.
नितेश तिवारी दिग्दर्शित, भव्य दिव्य कलाकृती असलेल्या ‘रामायण’ चित्रपटाने भारतीय सिनेसृष्टीला जागतिक स्तरावर एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले आहे.