Home महाराष्ट्र नाशिक Nashik Crime : होस्टेलवर राहणाऱ्या तरुणींना अश्लील व्हिडिओ पाठवले अन्…, 21 वर्षीय संशयित पेठमधून ताब्यात

Nashik Crime : होस्टेलवर राहणाऱ्या तरुणींना अश्लील व्हिडिओ पाठवले अन्…, 21 वर्षीय संशयित पेठमधून ताब्यात

0
Nashik Crime :  होस्टेलवर राहणाऱ्या तरुणींना अश्लील व्हिडिओ पाठवले अन्…, 21 वर्षीय संशयित पेठमधून ताब्यात

Nashik Crime :  नाशिकमध्ये शिक्षणासाठी होस्टेलमध्ये राहणाऱ्या तरुणींना लक्ष्य करून त्रास दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. वेगवेगळ्या मोबाइल क्रमांकांवरून अश्लील व्हिडिओ पाठवणे, तसेच जिवे मारण्याची धमकी देऊन दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप एका तरुणावर करण्यात आला आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत गुन्हे शाखेच्या अंबड युनिट-३ पथकाने संशयिताला पेठ येथून ताब्यात घेतले आहे. प्रसाद मारुती माळी (वय २१, रा. सोनेवाडी, ता. सिन्नर, जि. नाशिक) असे त्याचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुणी आणि तिची मैत्रीण शिक्षणासाठी होस्टेलमध्ये वास्तव्यास आहेत. याचदरम्यान संशयित प्रसाद माळी हा त्यांना वेगवेगळ्या मोबाइल क्रमांकांवरून अश्लील व्हिडिओ पाठवत असल्याचा आरोप आहे. एवढेच नाही तर त्यांना जिवे मारण्याची धमकीही दिली जात असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

https://www.prahaar.in/2026/11/26/nashik-administration-on-alert-for-the-simhastha-kumbh-mela-deadline-of-december-15-set-for-all-departments-directives-issued-to-prepare-an-action-plan-for-disaster-management/

या प्रकरणी शुक्रवारी (दि. २०) रात्री अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन गुन्हे शाखेने संशयिताचा शोध सुरू केला. तपासादरम्यान अंबड गुन्हे शाखा युनिट-३ चे पोलीस उपनिरीक्षक मोतीलाल पाटील यांनी तांत्रिक विश्लेषणाच्या मदतीने संशयित पेठ येथे असल्याची माहिती मिळवली.

त्यानंतर पोलीस उपनिरीक्षक मोतीलाल पाटील, पोलीस हवालदार प्रकाश बोडके, योगेश चव्हाण आणि पोलीस अंमलदार कुणाल पचलोरे यांच्या पथकाने मंगळवारी (दि. २४) रात्री साडेनऊच्या सुमारास पेठ येथील शिवांजली हॉटेल परिसरात सापळा रचला. या कारवाईत प्रसाद माळी याला ताब्यात घेण्यात आले. या प्रकरणाचा पुढील तपास अंबड पोलीस करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here