Home ब्रेकिंग न्यूज Mumbai bomb threat news : मुंबईच्या महापौर कार्यालयासह अमिताभ बच्चन यांच्या घराला बॉम्बस्फोटाची धमकी; मेट्रो स्थानकेही लक्ष्य, मुंबई पोलीस हाय अलर्टवर

Mumbai bomb threat news : मुंबईच्या महापौर कार्यालयासह अमिताभ बच्चन यांच्या घराला बॉम्बस्फोटाची धमकी; मेट्रो स्थानकेही लक्ष्य, मुंबई पोलीस हाय अलर्टवर

0
Mumbai bomb threat news : मुंबईच्या महापौर कार्यालयासह अमिताभ बच्चन यांच्या घराला बॉम्बस्फोटाची धमकी; मेट्रो स्थानकेही लक्ष्य, मुंबई पोलीस हाय अलर्टवर

मुंबई : मुंबईच्या महापौर रितू तावडे (Ritu Tawde) यांच्या कार्यालयासह बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachhan) यांच्या जुहू येथील ‘जलसा’ निवासस्थानाला बॉम्बस्फोटाची धमकी मिळाल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे. यासोबतच मुंबईतील मेट्रो स्थानकांवरही आयईडी (IED) स्फोट घडवून आणण्याचा इशारा देणारा ई-मेल प्राप्त झाला असून, या घटनेनंतर मुंबई पोलीस आणि सुरक्षा यंत्रणा हाय अलर्टवर आल्या आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, २६ नोव्हेंबर रोजी मध्यरात्री महापौर कार्यालय आणि संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांना हा धमकीचा ई-मेल पाठवण्यात आला. या ई-मेलमध्ये दुपारी १ वाजून ११ मिनिटांनी महापौर कार्यालयावर ग्रेनेड हल्ला करण्याची थेट धमकी देण्यात आली आहे. तसेच मुंबईतील महत्त्वाची मेट्रो स्थानके आणि अमिताभ बच्चन यांच्या ‘जलसा’ बंगल्यालाही लक्ष्य करण्याचा उल्लेख या मेलमध्ये करण्यात आला आहे.

https://www.prahaar.in/2026/11/26/the-wounds-of-26-11-remain-fresh-even-today-ujjwal-nikam-raises-a-major-question/

विशेष म्हणजे, या ई-मेलमध्ये खलिस्तान आणि ‘खलिस्तान नॅशनल आर्मी’चा उल्लेख आढळून आला आहे. यापूर्वीच गायक आणि अभिनेता दिलजीत दोसांझ याच्या २७ नोव्हेंबर रोजी मुंबईतील महालक्ष्मी रेसकोर्स येथे होणाऱ्या लाइव्ह कॉन्सर्टलाही अशाच प्रकारची धमकी देण्यात आली होती.

मुंबईवरील २६/११ च्या दहशतवादी हल्ल्याच्या स्मृतिदिनीच हा धमकीचा ई-मेल आल्याने प्रशासनाने या प्रकरणाची अत्यंत गंभीर दखल घेतली आहे. या पार्श्वभूमीवर महापौर कार्यालय, मेट्रो स्थानके, अमिताभ बच्चन यांचे निवासस्थान आणि महालक्ष्मी रेसकोर्ससह मुंबईतील सर्वच संवेदनशील ठिकाणी सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली असून, सायबर सेलकडून हा ई-मेल कोठून पाठवण्यात आला याचा कसून तपास सुरू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here