कल्याण: कल्याणकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे. कल्याण पूर्वेतील विठ्ठलवाडी स्मशानभूमीजवळ असणाऱ्या खडेगोलवली नाल्यावरील ब्रिज तोडून नवीन पुन:र्बांधणीचे काम हाती घेण्यात आले आहे. ह्या कामाला गेल्या आठवड्यापासून सुरूवात झाली असून याचा फटका कल्याण पूर्वेतील रहिवाशांसह विठ्ठलवाडी आणि उल्हासनगरमधील नागरिकांना सुद्धा वाहतुकीसाठी अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. पुना लिंक रोडवरील स्व.आनंद दिघे चौक, कोळसेवाडी पोलीस ठाणे, विठ्ठलवाडी आणि विठ्ठलवाडी रेल्वे स्टेशन परिसरामध्ये वाहतुककोंडी होऊ नये आणि वाहतूकदारांची वाहतूक सुरळीत राहावी, यासाठी पर्यायी मार्गांचा वापर करण्याचा सल्ला दिला आहे.
https://www.prahaar.in/2026/11/24/shocking-17-people-suffer-food-poisoning-after-eating-shawarma-children-among-those-affected-currently-undergoing-treatment-in-the-hospital/
वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त पंकज शिरसाठ यांनी अधिसुचना जाहीर करत वाहतुकदारांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचा सल्ला दिला आहे. कल्याण पूर्व, पुनालिक रोडवरून खडेगोळववली नाला/ ब्रिजवरून त्यापुढे विठ्ठलवाडी रेल्वे स्टेशनवरून श्रीराम चौककडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनाना स्व. आनंद दिघे चौक/ स्मशानभुमीच्या चौकाजवळच ‘प्रवेश बंद’ करण्यात आला आहे. सर्व प्रकराच्या वाहनांना स्व. आनंद दिघे उड्डाणपुलावरून सम्राट चौकावरून इच्छित स्थळी जाण्याचा पर्यायी मार्ग सुचवला आहे. श्रीराम चौक आणि विठलवाडी रेल्वे स्टेशन पुर्वेकडून खडेगोळववली नाला/ब्रिजवरुन कल्याण पुर्व, पुना लिक रोडकडे येणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना श्रीराम चौकाच्या येथे ‘प्रवेश बंद’ करण्यात आला आहे. सर्व प्रकारच्या वाहनांना छत्रपती शिवाडी महाराज प्रवेशद्वार येथून शांतीनगर उल्हासनगर सम्राट चौक येथुन इच्छित स्थळी पर्यायी मार्ग सुचवण्यात आला आहे.
कोळसेवाडी वाहतूक उपविभागातील पुनालिंक रोडवरील खडेगोळवली नाला/ब्रिज येथील जुन्या पुलाच्या पुनर्बांधणीचे काम दि. २० नोव्हेंबर २०२६ पासून सुरू होणार आहे.
नागरिकांनी प्रवासाचे नियोजन करून वाहतूक पोलिसांना सहकार्य करावे.
#ThanePolice #TrafficUpdate #TrafficAdvisory https://t.co/mjEUomQs9G
— ठाणे पोलीस.. Thane Police (@ThaneCityPolice) November 18, 2026
कल्याण पूर्वेत, पुणे लिंक रोडवरील विठ्ठलवाडी रेल्वे स्थानकाजवळच्या स्मशानभूमी परिसरात पुलाचे बांधकाम सुरू आहे. या कामामुळे, बाधित रस्ता 21 नोव्हेंबर 2026 ते 20 मार्च 2027 पर्यंत वाहतुकीसाठी बंद राहील. ह्या प्रकल्पामुळे रस्त्यांची पायाभूत सुविधा आणि संपर्क सुधारण्याची अपेक्षा असली तरी, त्यांच्या अंमलबजावणीमुळे दैनंदिन प्रवाशांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. नोकरदार, शालेय वाहतूक चालक आणि या मार्गांचा नियमित वापर करणाऱ्या रहिवाशांना प्रवासाला जास्त वेळ लागण्याची आणि वाहतूक कोंडीचा सामना करावा लागू शकतो. प्रवाशांना त्यांच्या प्रवासाचे आगाऊ नियोजन करण्याचा, वाहतुकीच्या नियमांचे पालन करण्याचा आणि प्रतिबंधित मार्ग टाळण्याचा सल्ला देण्यात आला आहे. वाहतूक विभागाने वाहनचालकांना वाहतूक कर्मचाऱ्यांशी सहकार्य करण्याचे आणि बांधकाम कालावधीत दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन केले आहे.
https://www.prahaar.in/2026/11/24/159-teachers-and-staff-members-honored-at-the-vasant-smruti-awards-ceremony-personnel-who-carried-out-rescue-operations-during-the-fire-at-raheja-garden-were-also-felicitated/