Home महत्वाची बातमी Winter Health Tips : थंडीच्या दिवसांत इम्युनिटी कमजोर होते? आहार आणि सवयींमध्ये करा ‘हे’ बदल

Winter Health Tips : थंडीच्या दिवसांत इम्युनिटी कमजोर होते? आहार आणि सवयींमध्ये करा ‘हे’ बदल

0
Winter Health Tips : थंडीच्या दिवसांत इम्युनिटी कमजोर होते? आहार आणि सवयींमध्ये करा ‘हे’ बदल
AI Generated Image

थंडी सुरू झाली की सर्दी, खोकला, ताप, फ्लू यांचा त्रास वाढतो. अनेकांना वाटतं की थंडीमुळे इम्युनिटी कमी होते, पण यामागे फक्त थंडी नाही तर आपल्या सवयीही कारणीभूत असतात. थंडीत आपण जास्त वेळ घरात, बंद खोलीत बसतो. त्यामुळे एकाला सर्दी झाली की ती दुसऱ्याला लवकर लागते. थंड आणि कोरडी हवा नाकाच्या आणि घशाच्या आतल्या भागाला कोरडं करते. हाच भाग आपल्याला व्हायरसपासून वाचवतो. तो कोरडा झाला की संसर्गाचा धोका वाढतो. थंडीत ऊन कमी मिळतं, त्यामुळे काही लोकांमध्ये व्हिटॅमिन डी कमी होतं. शिवाय थंडी म्हणून आपण व्यायाम टाळतो, पाणी कमी पितो, झोपही नीट होत नाही. या सगळ्याचा परिणाम इम्युनिटीवर होतो.

आहारात काय घ्याल?

थंडीत शरीराला ताकद देण्यासाaठी आहारात पौष्टिक पदार्थांचा समावेश करा. आवळा, संत्रं, पेरू यांसारखी मोसमी फळं व्हिटॅमिन सी देतात. पालक, मेथीसारख्या हिरव्या भाज्या, डाळी, दूध, दही आणि संपूर्ण धान्य यातून शरीराला गरजेची पोषकतत्त्वं मिळतात. थंडीत गरम सूप, दलिया आणि घरचं ताजं जेवण हा उत्तम पर्याय आहे. दिवसभर पुरेसं पाणी प्या. साधं पाणी प्यायला कंटाळा आला तर कोमट पाणी किंवा कमी साखरेची हर्बल चहा घ्या. ऊन आलं की थोडा वेळ बाहेर बसा. व्हिटॅमिन डी कमी असल्याची शंका असेल तर डॉक्टरांचा सल्ला घेऊनच तपासणी आणि सप्लिमेंट घ्या. स्वतःहून गोळ्या घेऊ नका.

prahaar.in/2026/11/24/crude-oil-prices-fall-sharply-in-90-days-7-major-benefits-for-india-economy-and-common-man-pocket/

या सवयीही तितक्याच महत्त्वाच्या

फक्त खाणं नाही, तर रोजच्या सवयीही इम्युनिटीसाठी महत्त्वाच्या आहेत. थंडी आहे म्हणून व्यायाम पूर्ण बंद करू नका. घरातच योगा, स्ट्रेचिंग किंवा हलकी कसरत करा. जागतिक आरोग्य संघटनेनुसार 18 ते 64 वयोगटातील प्रौढांनी आठवड्यात किमान 150 मिनिटं मध्यम गतीची शारीरिक हालचाल करावी. रोज 7 ते 9 तास झोप घ्या आणि ताण कमी ठेवा. संसर्ग टाळण्यासाठी साबणाने हात धुवा, खोकताना-शिंकताना तोंड-नाक झाका आणि खोलीत मोकळी हवा येऊ द्या. थोडा आहार, थोडी काळजी आणि चांगल्या सवयी ठेवल्या तर थंडीही तुम्हाला आजारी पाडू शकणार नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here