भारत ए संघाने साखळी फेरीच्या शेवटच्या सामन्यात युएईचा सात गडी राखून धुव्वा उडवत आशिया कप रायझिंग स्टार्स 2026 च्या उपांत्य फेरीत दिमाखात धडक मारली आहे. उपांत्य फेरीत भारत ए संघासमोर श्रीलंकेचं आव्हान असणार आहे. या सामन्यातील विजयी संघाला अंतिम फेरीचं तिकीट मिळणार आहे. त्यामुळे दोन्ही संघांसाठी करो या मरोची लढाई आहे. या स्पर्धेत श्रीलंकेचा संघ आतापर्यंत अपराजित राहिला असल्याने भारतासमोर तगडं आव्हान असणार आहे. साखळी फेरीत पाकिस्तान-ए कडून पराभव पत्करावा लागल्याने टीम इंडिया आपल्या गटात दुसऱ्या स्थानावर राहिली. दुसरीकडे, श्रीलंकेने आपल्या गटात अव्वल स्थान पटकावले. त्यामुळेच आता उपांत्य फेरीत भारत आणि श्रीलंका आमनेसामने आले आहेत. चला तर मग जाणून घेऊया, हा हायव्होल्टेज सामना नेमका कधी आणि कुठे खेळला जाईल? तसेच या सामन्याचे लाईव्ह प्रक्षेपण कुठे पाहता येईल?
सामन्याची वेळ आणि ठिकाण कोणते?
इंडिया-ए विरुद्ध श्रीलंका-ए हा उपांत्य फेरीचा महामुकाबला गुरुवार, 26 नोव्हेंबर रोजी दोहा येथील वेस्ट एंड पार्क इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमवर रंगणार आहे. भारतीय वेळेनुसार दुपारी 3.30 वाजता या सामन्याला सुरुवात होईल, तर त्यापूर्वी अर्धा तास आधी म्हणजेच दुपारी 3.00 वाजता नाणेफेक होईल.
टीव्हीवर हा सामना कुठे पाहता येईल?
जर तुम्हाला टीव्हीवर या रोमांचक लढतीचा आनंद घ्यायचा असेल, तर तुम्ही सोनी स्पोर्ट्स नेटवर्कच्या वाहिन्यांवर या सामन्याचे थेट प्रक्षेपण पाहू शकता.
https://www.prahaar.in/2026/11/25/ind-vs-nz-team-india-cancels-practice-session-ahead-of-christchurch-test-heres-why/
लाईव्ह स्ट्रीमिंग कुठे उपलब्ध असेल?
मोबाईल किंवा लॅपटॉपवर हा सामना पाहणाऱ्या क्रीडाप्रेमींसाठी सोनी लिव्ह अॅप आणि वेबसाईटवर सामन्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग उपलब्ध करून देण्यात आले आहे.
IND A vs SL A: हेड टू हेड आकडेवारी
- एकूण सामने: 18
- भारत ए विजय: 9
- श्रीलंका ए विजय: 6
- अनिर्णित : 3
खेळपट्टीचा अहवाल
दोहा येथील खेळपट्टी आतापर्यंत फलंदाज आणि गोलंदाज दोघांसाठीही समतोल राहिली आहे. नवीन चेंडूने वेगवान गोलंदाजांना चांगली स्विंग मिळत आहे, तर फिरकीपटूंना संथ वळण मिळताना दिसत आहे. जे फलंदाज खेळपट्टीवर थोडा वेळ घालवून खेळतील, ते मोठी धावसंख्या उभारू शकतात. या मैदानावर नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणे हा एक चांगला पर्याय ठरेल.
दोन्ही संघांची संभाव्य प्लेइंग इलेव्हन
भारत ए : वैभव सूर्यवंशी, अभिषेक शर्मा, प्रभसिमरन सिंग, कुमार कुशाग्र (यष्टीरक्षक), तिलक वर्मा (कर्णधार), रिंकू सिंग, सूर्यांश शेडगे, शाहबाज अहमद, हर्ष दुबे, प्रिन्स यादव, अर्शद खान.
श्रीलंका ए: लसिथ क्रूसपुल्ले, निशान मदुष्का (यष्टीरक्षक), सिनेथ जयवर्धने, पवन रथनायके (कर्णधार), निपुन धनंजय, वनुजा सहन, जनिथ लियानागे, लाहिरू समरकून, रविंदू फर्नांडो, दुलाज समुदिथा, विजयकांत व्यासकांत.