Home क्रीडा अवघ्या 53 चेंडूंमध्ये 204 धावा आणि 28 षटकार; पोराच्या वादळाने सूर्यकुमार यादवही म्हणाला, “आता तू माझी प्रेरणा आहेस”

अवघ्या 53 चेंडूंमध्ये 204 धावा आणि 28 षटकार; पोराच्या वादळाने सूर्यकुमार यादवही म्हणाला, “आता तू माझी प्रेरणा आहेस”

0
अवघ्या 53 चेंडूंमध्ये 204 धावा आणि 28 षटकार; पोराच्या वादळाने सूर्यकुमार यादवही म्हणाला, “आता तू माझी प्रेरणा आहेस”
अवघ्या 53 चेंडूंमध्ये 204 धावा आणि 28 षटकार; पोराच्या वादळाने सूर्यकुमार यादवही म्हणाला, "आता तू माझी प्रेरणा आहेस"

दोहा येथे सुरू असलेल्या एसीसी रायझिंग स्टार्स आशिया कप 2026 मध्ये भारताच्या युवा फलंदाज वैभव सूर्यवंशीने संयुक्त अरब अमिराती विरुद्धच्या सामन्यात 53 चेंडूंमध्ये 204 धावांची तुफानी खेळी करत लिस्ट A क्रिकेटचे सर्व विक्रम मोडीत काढले आहेत. वैभवने अवघ्या 28 चेंडूंमध्ये (6.3 षटकांत) आपले शतक पूर्ण केले. यासह त्याने ऑस्ट्रेलियाच्या जेक फ्रेझर-मॅकगर्कने 2023 मध्ये नोंदवलेला 29 चेंडूंतील शतकाचा विक्रम मागे टाकत लिस्ट A क्रिकेटमधील सर्वात जलद शतकाचा नवा विक्रम रचला.

या युवा खेळाडूचा तडाखा इथेच थांबला नाही; त्याने 40 चेंडूंमध्ये 150 धावांचा टप्पा ओलांडला. गेल्या वर्षी बिहार कडून खेळताना अरुणाचल प्रदेश विरुद्ध त्याने 59 चेंडूंमध्ये 150 धावा केल्या होत्या, तो स्वतःचाच विक्रम त्याने 19 चेंडूंनी सुधारला.

https://www.prahaar.in/2026/11/25/after-his-record-fast-double-century-what-is-vaibhav-sooryavanshi-next-target-could-he-now-break-these-two-major-record/

द्विशतक आणि षटकारांचा पाऊस

केवळ 52 चेंडूंमध्ये त्याने द्विशतक पूर्ण केले. याआधीचा विक्रम न्यूझीलंडच्या चॅड बोव्सच्या नावावर होता, ज्याने फोर्ड ट्रॉफीमध्ये कॅन्टरबरी कडून खेळताना ओटागो विरुद्ध 103 चेंडूंमध्ये द्विशतक झळकावले होते. वैभवने हा विक्रम निम्म्याहून अधिक वेगाने मागे टाकला.

या ऐतिहासिक खेळीदरम्यान वैभवने 7 चौकार आणि तब्बल 28 षटकार लगावले. लिस्ट A क्रिकेटच्या एका डावात एखाद्या फलंदाजाने मारलेले हे सर्वाधिक षटकार आहेत. याआधी 2018 मध्ये डार्सी शॉर्टने एका डावात 23 षटकार मारण्याचा विक्रम केला होता, जो वैभवने मोडीत काढला. शेवटी तो 204 धावांवर बाद झाला, पण तोपर्यंत त्याने विक्रमांच्या पुस्तकात आपले नाव सुवर्ण अक्षरांनी कोरले होते.

सूर्यकुमार यादवसह दिग्गजांचे कौतुक

भारताचा T20 विश्वचषक विजेता कर्णधार सूर्यकुमार यादवने X वर लिहिले, “वैभव सूर्यवंशी, आता तू माझी प्रेरणा आहेस. काय जबरदस्त खेळाडू आहेस! #special” माजी क्रिकेटपटू सुरेश रैना यांनीही त्याचे भरभरून कौतुक केले. लहान वयात द्विशतक झळकावणे हे वैभवच्या निर्भय मानसिकतेचे आणि असाधारण क्षमतेचे प्रतीक असल्याचे सांगत त्यांनी त्याला मोठी स्वप्ने पाहत राहण्याचा आणि चमकत राहण्याचा सल्ला दिला. मोहम्मद कैफ म्हणाला की, 53 चेंडूंमध्ये 204 धावा आणि 28 षटकार मारणारा वैभव विक्रम मोडण्याची वाट पाहत नसून क्रिकेटचा इतिहास नव्याने लिहित आहे आणि तो भावी सुपरस्टार आहे. तर एस. बद्रीनाथ म्हणाला की, वैभवच्या सध्याच्या कामगिरीचे वर्णन करायला शब्द अपुरे पडत असून त्याने अशीच प्रगती करत देशाचा अभिमान वाढवावा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here