रोगप्रतिकारशक्ती वाढवणासाठी आयुर्वेदिक उपाय! घरच्या घरी बनवा वर्षभर टिकणारा झणझणीत आवळ्याचा ठेचा
आवळा हा व्हिटॅमिन-C चा सर्वात मोठा नैसर्गिक स्रोत आहे, त्यामुळे रोज थोडा ठेचा खाल्ल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढते.
आवळा, हिरवी मिरची, लसूण, जिरे आणि मीठ घालून बनवलेला हा ठेचा चवीला झणझणीत आणि आरोग्यासाठी उत्तम असतो.
आवळे वाफवून किंवा उकडून घेऊन त्याचा बिया काढून, खलबत्त्यात किंवा मिक्सरमध्ये जाडसर वाटून हा ठेचा बनवला जातो.
वरून मोहरी, हिंग आणि हळदीची फोडणी दिली की ठेचा वर्षभर टिकतो आणि त्याची चव आणखी वाढते.
जेवणासोबत रोज एक चमचा आवळ्याचा ठेचा खाल्ल्याने पचन सुधारते, सर्दी-खोकल्यापासून बचाव होतो आणि त्वचा-केसही निरोगी राहतात.