EPFO New Rules 2026: नोकरदार व्यक्तींसाठी, पीएफ हा केवळ बचतीचा स्रोत नाही, तर सेवानिवृत्तीनंतर मिळणारा आर्थिक आधारही असतो. आयुष्यभर केलेल्या कामाचे पगारातून पैसे कापून कर्मचारी वर्गाचे पैसे सेवानिवृत्तीनंतर पीएफ खात्यात जमा केले जातात. यासंदर्भात एक महत्वाची बातमी समोर आली आहे. आतापर्यंत, बहुतेक कर्मचारी सेवानिवृत्तीनंतर त्यांच्या पीएफ खात्यात जमा असलेली संपूर्ण रक्कम एकाच वेळी काढत असत.
परंतु, ईपीएफओ मध्ये आता यात बदल करण्यात आला आहे. सरकारच्या या नवीन उपक्रमामुळे सेवानिवृत्तीनंतर पीएफची रक्कम एकरकमी काढण्याऐवजी हप्त्यांमध्ये काढता येणार आहे. महत्वाचे म्हणजे या हप्त्यांवर कर सवलतही दिली जाणार आहे.
19 नोव्हेंबर 2026 रोजी कामगार मंत्री मनसुख मांडविया यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या ईपीएफओच्या सीबीटीच्या २४० व्या बैठकीत एसडब्ल्यूपीला मंजुरी देण्यात आली. हप्त्यांमध्ये पैसे काढण्याच्या कर नियम सोपे करण्यासाठी अर्थ मंत्रालयाशी यासंदर्भात चर्चा करण्यात आली आहे. यासंदर्भात प्रस्तावही त्यामध्ये मांडण्यात आला. नव्या नियमांमुळे, सेवानिवृत्ती कर्मचाऱ्यांना आता त्यांच्या गरजेनुसार टप्प्याटप्प्याने पैसे काढण्याचा पर्याय उपलब्ध होणार आहे. यालाच पद्धतशीर पैसे काढण्याची योजना म्हणजेच सिस्टिमॅटिक विथड्रॉवल प्लॅन SWP असे म्हणतात.
https://www.prahaar.in/2026/11/25/star-pravah-18-years-18-years-of-trust-star-pravahs-journey-of-forging-bonds-with-millions-of-hearts/
याचा फायदा कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीनंतर त्यांची संपूर्ण बचत एकाच वेळी काढण्याची गरज पडणार नाही. ते त्यांची रक्कम खात्यात ठेवू शकतील आणि नियमित अंतराने हप्त्यांमध्ये पैसे काढू शकतील. शिल्लक रकमेवर ईपीएफ नियमांनुसार व्याज मिळत राहील. एखाद्या कर्मचाऱ्याच्या सेवानिवृत्तीच्या वेळी त्यांच्या पीएफ खात्यात ₹20 लाख जमा आहेत. तर ते त्यांची संपूर्ण रक्कम एकाच वेळी काढण्याऐवजी, गरजेनुसार हप्त्यांमध्ये पैसे काढू शकतील. यामुळे सेवानिवृत्तीनंतर नियमित खर्च भागवण्यास मदत होऊ शकते.
या नवीन योजनेसंदर्भातील सर्वात मोठा प्रश्न कर आकारणीचा, सरकार हप्त्यांमध्ये पीएफ काढण्यासंबंधीचे कर नियम अधिक सोपे आणि स्पष्ट करण्याचा प्रयत्न करत आहे. या संदर्भात कामगार मंत्रालय अर्थ मंत्रालयाला आयकर कायद्यात आवश्यक सुधारणांचा प्रस्ताव देत आहे. तसेच एसडब्ल्यूपी (SWP) अंतर्गत मिळालेला प्रत्येक हप्ता पूर्णपणे करमुक्त असणार आहे. सरकारने यावर अंतिम नियम जारी केलेले नाहीत.
या नवीन EPFO योजनेमुळे सुरुवातीच्या टप्प्यात अंदाजे 6.32 लाख सदस्यांना याचा फायदा होण्याची शक्यता आहे. यामध्ये 55 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या आणि ज्यांच्या पीएफ खात्यात 5 लाख रुपयांपेक्षा अधिक रक्कम शिल्लक आहे, अशा सदस्यांचा समावेश आहे. या निर्णयाचा उद्देश नागरिकांना सेवानिवृत्तीनंतर नियमित उत्पन्न उपलब्ध करून देणे हा आहे. यामुळे त्यांना त्यांची संपूर्ण बचत एकाच वेळी काढण्याची, गुंतवणूक करण्याची किंवा तिचे व्यवस्थापन करण्याची गरज भासणार नाही. ईपीएफच्या हप्त्यांव्यतिरिक्त, कर्मचाऱ्यांना ईपीएस अंतर्गत मासिक पेन्शनचाही लाभ घेता येणार आहे.