Home ताज्या घडामोडी पनवेल- कर्जत लोकल प्रवासाचा मार्ग मोकळा! 15 डिसेंबरपासून महत्त्वाची ट्रायल पार पडणार

पनवेल- कर्जत लोकल प्रवासाचा मार्ग मोकळा! 15 डिसेंबरपासून महत्त्वाची ट्रायल पार पडणार

0
पनवेल- कर्जत लोकल प्रवासाचा मार्ग मोकळा! 15 डिसेंबरपासून महत्त्वाची ट्रायल पार पडणार
पनवेल- कर्जत लोकल प्रवासाचा मार्ग मोकळा! 15 डिसेंबरपासून पार पडणार महत्त्वाची ट्रायल फोटो सौजन्य: सोशल मीडिया

मुंबई: कर्जत- पनवेल मार्गावरील प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आहे. 29.6 किमी लांबीच्या पनवेल- कर्जत मार्गिकेच्या रेल्वे कॉरिडोरविषयी महत्त्वाची अपडेट आहे. मुंबई रेल्वे विकास महामंडळ (एमआरव्हीसी)ने दिलेल्या माहितीनुसार, येत्या 15 डिसेंबर 2026 पासून या नव्या मार्गावरील ओव्हरहेड वायरमध्ये (ओएचई) वीजपुरवठा सुरू करण्याच्या तयारीमध्ये आहे. वीजपुरवठा सुरळीत झाल्यानंतर या मार्गावरील पुढील तांत्रिक तपासणी आणि लोकलच्या चाचण्यांचा मार्ग मोकळा होणार आहे. मात्र, सर्वसामान्य प्रवाशांसाठी लोकल सेवा सुरू करण्यापूर्वी आवश्यक सुरक्षा पडताळणी आणि रेल्वेच्या मंजूरीची परवानगी घेणे बंधनकारक असणार आहे.

https://www.prahaar.in/2026/11/25/a-shawarma-feast-at-night-a-hospital-visit-by-morning-34-people-affected-in-bhiwandi/

सध्या पनवेल आणि कर्जत दरम्यान प्रवास करण्यासाठी प्रवाशांना कर्जत- कल्याण- ठाणे- पनवेल असा मोठा वळसा घालून प्रवास करावा लागतो. हा नवा कॉरिडोर सुरू झाल्यानंतर दोन्ही शहरांदरम्यान थेट उपनगरीय रेल्वे जोडणी उपलब्ध होणार आहे. अनेक तासांचा प्रवास करून चाकरमान्यांना प्रवास करायला लागतो, पण आता कर्जत- पनवेल मार्ग सुरू झाल्यानंतर प्रवाशांना एक नवा आणि सोयीस्कर पर्यायी रेल्वे मार्ग मिळणार असून, त्याचा थेट फायदा कल्याण रेल्वे मार्गावरील प्रवाशांची गर्दी कमी होण्यासाठी मदत होणार आहे. सुमारे 2782 कोटी रुपये खर्च करून उभारल्या जाणाऱ्या या प्रकल्पात एकूण पाच स्थानकांचा समावेश असणार आहे. यामध्ये पनवेल, चिखले, मोहोपे, चौक आणि कर्जत अशा पाच स्थानकांचा समावेश आहे.

https://www.prahaar.in/2026/11/24/mumbai-book-festival-is-a-celebration-of-sensitivity-and-humanity-says-cm-devendra-fadnavis/

दरम्यान, कर्जत- पनवेल मार्ग भौगोलिकदृष्ट्या आव्हानात्मक असलेल्या या मार्गावर एकूण तीन बोगदे उभारण्यात आले आहेत. वावरले गावाजवळ तयार करण्यात आलेला 2.6 किलोमीटर लांबीचा बोगदा या प्रकल्पातील एक महत्त्वाचे वैशिष्ट्य मानले जाते. याशिवाय या रेल्वे मार्गावर लहान- मोठे पूल आणि उड्डाणपूल यांचेही बांधकाम प्रगतीपथावर आहेत. एमआरव्हीसीकडून येत्या 15 डिसेंबर रोजी किंवा त्यानंतर या नव्या मार्गाच्या अप आणि डाउन ट्रॅकसह रेल्वे सायडिंग आणि इतर संबंधित मार्गांवर वीजपुरवठा सुरू करण्यात येणार आहे. त्यानंतर रेल्वे प्रशासनातील अधिकारी वीज यंत्रणा, सिग्नलिंग व्यवस्था आणि इतर तांत्रिक बाबींची बारकाईने पाहणी करतील. तांत्रिक तपासणीनंतर रेल्वे चालवून चाचण्या घेतली जाणार आहे. सर्व सुरक्षा निकष पूर्ण झाल्यानंतर आणि आवश्यक परवानग्या मिळाल्यानंतरच प्रवासी लोकल सेवा सुरू होईल.

https://www.prahaar.in/2026/11/24/india-cyprus-maritime-business-forum-held-in-mumbai-focus-on-cooperation-in-shipbuilding-and-green-shipping/

ओव्हर हेड वायरमध्ये वीजपुरवठा सुरू झाल्यानंतर रेल्वे रुळांच्या परिसरात राहणार्‍या नागरिकांनी आणि तिथे काम करणाऱ्या कर्मचार्‍यांनी अधिक काळजी घेणे गरजेचे आहे. रेल्वे प्रशासनाने नागरिकांना विजेच्या तारांपासून आणि इतर उपकरणांपासून सुरक्षित अंतर राखण्याचे आवाहन करण्यात येणार आहे. वीजपुरवठा सुरू झाल्यानंतर या विजेच्या तारांमध्ये नेहमीच वीजपुरवठा सुरू असेल, या विचारामध्ये राहून काळजी घेण्याची सूचना देण्यात आल्या आहेत. या प्रकल्पामुळे पनवेल, नवी मुंबई, कर्जत आणि वेगाने विकसित होणाऱ्या आजूबाजूच्या भागांची रेल्वे कनेक्टिव्हिटी अधिक मजबूत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here