Home ताज्या घडामोडी Star Pravah 18 Years: लाखो मनांशी नातं जोडत स्टार प्रवाहची विश्वासाची 18 वर्षे

Star Pravah 18 Years: लाखो मनांशी नातं जोडत स्टार प्रवाहची विश्वासाची 18 वर्षे

0
Star Pravah 18 Years: लाखो मनांशी नातं जोडत स्टार प्रवाहची विश्वासाची 18 वर्षे
Photo: Prahaar

Star Pravah 18 Years: काही प्रवास फक्त अंतर पार करत नाहीत, तर मनं जोडतात… काही प्रवास केवळ मनोरंजन करत नाहीत, तर प्रेक्षकांच्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनतात. असाच प्रवास पूर्ण करत स्टार प्रवाह वाहिनीने १८ वर्ष पूर्ण केली आहेत. आणि या 18 वर्षांत महाराष्ट्राची नंबर 1 वाहिनी बनून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य केले आहे. स्टार प्रवाहचा 18 वर्षांचा प्रवास हा असाच प्रेमाचा, विश्वासाचा, आणि अभिमानाचा आहे. महाराष्ट्राची नंबर वन वाहिनी हे बिरुद अभिमानाने मिरवणाऱ्या स्टार प्रवाहने गेल्या १८ वर्षांत मराठी मनोरंजनविश्वात स्वतःचं एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. बदलत्या काळानुसार प्रेक्षकांची अभिरुची, मनोरंजनाची माध्यमं आणि आशय बदलत असताना स्टार प्रवाहने मात्र प्रेक्षकांशी जोडलेलं आपुलकीचं नातं कायम जपलं आहे.

https://www.prahaar.in/2026/11/25/recruitment-for-doctors-in-the-crpf-walk-in-interviews-for-19-positions-salary-of-85000-rupees/

या प्रवासात अनेक लोकप्रिय मालिकांनी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. अनेक व्यक्तिरेखा घराघरांत पोहोचल्या. कधी हसवलं, कधी रडवलं, कधी नात्यांची नवी परिभाषा शिकवली, तर कधी सामाजिक विषयांना मनोरंजनाच्या माध्यमातून प्रभावीपणे हात घातला. प्रत्येक मालिकेने, प्रत्येक कथेने आणि प्रत्येक पात्राने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळी जागा निर्माण केली. मराठी संस्कृती, परंपरा आणि आधुनिक विचार यांचा सुंदर संगम घडवत वाहिनीने आपल्या कार्यक्रमांमधून महाराष्ट्राच्या मातीतली नाळ कायम जपली.

या 18 वर्षांच्या यशस्वी वाटचालीमागे कलाकारांसोबतच लेखक, दिग्दर्शक, निर्माते, तंत्रज्ञ, पडद्यामागील संपूर्ण टीम आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्टार प्रवाहवर भरभरून प्रेम करणारे लाखो प्रेक्षक या प्रत्येकाचं योगदान मोलाचं राहिलं. त्यानिमित्ताने स्टार प्रवाह वाहिनीने प्रेक्षकांचे आभार मानले आहेत. प्रेक्षकांच्या प्रेमामुळेच स्टार प्रवाह वाहिनीचा यापुढील प्रवास अधिक रंजक आणि उत्कंठावर्धक असेल यात शंका नाही, असेही त्यांनी सांगितले.

स्टार प्रवाह वाहिनीवरील मन उधाण वाऱ्याचे, तुजविण सख्यारे रे, देवयानी, स्वप्नांच्या पलीकडले, पुढंच पाऊल, विठू माऊली यांसारख्या अनेक सदाबहार मालिकांनी प्रेक्षकांचे मनोरंजन केले. तर आताच्या ठरलं तर मग, बाई तुझा आशीर्वाद, तुझ्याकडे तुला मागणे, घरोघरी मातीच्या चुली, यांसारख्या मालिका वहिनीला नंबर 1 ठेवण्यात यशस्वी ठरत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here